AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel US Iran War : युद्ध सुरु असताना इस्रायलची भीष्म प्रतिज्ञा, इराणला घाम फोडणारी सर्वात मोठी घोषणा

Israel US Iran War : इराण विरोधात अमेरिका-इस्रायलने पुकारलेल्या युद्धाला आठ दिवस होऊन गेले आहेत. आज इस्रायलने एक मोठी प्रतिज्ञा बोलून दाखवली आहे. शांती तर दूर राहिली पण त्यामुळे इराणचं टेन्शन नक्कीच वाढणार आहे. आतापर्यंत हजारो लोकांचा या युद्धात मृत्यू झाला आहे.

Israel US Iran War : युद्ध सुरु असताना इस्रायलची भीष्म प्रतिज्ञा, इराणला घाम फोडणारी सर्वात मोठी घोषणा
Israel-Iran War
| Updated on: Mar 08, 2026 | 3:44 PM
Share

मध्यपूर्वेत सुरु असलेल्या युद्धाचा आज आठवा दिवस आहे. इस्रायल-अमेरिकेकडून इराणवर जोरदार हल्ले सुरु आहेत. दुसरीकडे इराणकडून इस्रायल आणि आखाती देशांवर हल्ले होत आहेत. हे युद्धात इतक्यात तरी संपणार नाही हे स्पष्ट आहे. इराणमध्ये जो पर्यंत सत्ता बदल होत नाही, त्यांच्या मनासारखा नवीन शासक तिथे येणार नाही, तो पर्यंत हे युद्ध थांबणार नाही, हे अमेरिका आणि इस्रायल दोघांनी स्पष्ट केलय. त्यामुळे इतक्यात तरी या युद्धाचा शेवट नाही. उलट दिवसेंदिवस हे युद्ध अजून भीषण होत जाणार आहे. इस्रायलने हे युद्ध चालू असताना आता एक मोठी घोषणा केली आहे. ही घोषणा अशी आहे की, इराणमध्ये शांती नजीक भविष्यात शांतता स्थापित होणार नाही.

इराणने मागच्या आठवड्यात युद्धाच्या पहिल्याचं दिवशी सुप्रीम लीडर अयातोल्लाह अली खामेनीला संपवलं. आता त्यांच्यानंतर पुढचा उत्तराधिकारी कोण? याची चर्चा सुरु झाली आहे. अयातोल्लाह अली खामेनी यांच्या नंतर त्यांचा जो कोणी उत्तराधिकारी बनणार त्याला आणि या निवडीच्या प्रकियेत जे लोक असतील त्यांना संपवणार अशी प्रतिज्ञाच इस्रायलने केली आहे. तेहरान लवकरच नव्या सुप्रीम लीडरची घोषणा करण्याच्या जवळ आहे असं वृत्त इराणच्या स्टेट मीडियाने दिलं होतं.

IDF ने काय इशारा दिलाय?

जुलमी खामेनीला संपवल्यानंतर इराणमधील दहशतवादी राजवट पुन्हा एकदा एकत्र येऊन नवीन सुप्रीम लीडर नेमण्याच्या तयारीत आहे असं इस्रायली डिफेन्स फोर्सेसने म्हटलं. जो कोणी नवा सुप्रीम लीडर बनेल तसच त्याला नेमणाऱ्यांपर्यंत इस्रायलचे हात पोहोचतील असं इस्रायली संरक्षण दलाकडून सांगण्यात आलं. उत्तराधिकारी निवडण्याच्या प्रक्रियेत जे आहेत, त्यांना सुद्धा इस्रायली लष्कराकडून इशारा देण्यात आलाय.

मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले

इस्रायल-अमेरिकेने इराणच्या तेल डेपोंना लक्ष्य केलं. त्यामुळे तेहरानमधील इंधन पुरवठा विस्कळीत झाला आहे. इंधन डेपोचं नुकसान झाल्यामुळे वितरण साखळी प्रभावित झालीय असं तेहरानचे गव्हर्नर मोहम्मद सादेह यांनी सांगितलं. इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले सुरु आहेत.

Follow Us
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना.
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती.
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या...
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या....
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा.
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान.
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.