AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik School Reopen :नाशिकच्या 335 गावांमध्ये उद्यापासून शाळांची घंटा वाजणार, 296 शाळा सुरु

नाशिक जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावातील शाळा उद्यापासून सुरू होणार आहेत. सरकारच्या निर्ण्यानुसार केवळ 8 वी ते 12 पर्यंतचे वर्ग सुरू होतील.

Nashik School Reopen :नाशिकच्या 335 गावांमध्ये उद्यापासून शाळांची घंटा वाजणार, 296 शाळा सुरु
शाळा
| Edited By: | Updated on: Jul 18, 2021 | 11:09 AM
Share

नाशिक: राज्य सरकारनं कोरोनामुक्त ग्रामीण भागातील 8 वी ते 12वीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावातील शाळा उद्यापासून सुरू होणार आहेत. सरकारच्या निर्ण्यानुसार केवळ 8 वी ते 12 पर्यंतचे वर्ग सुरू होतील. 1 महिन्यात ज्या गावात 1 ही रुग्ण नाही अशा गावात शाळा सुरू होणार असल्याची माहिती आहे.

किती शाळा सुरु होणार

नाशिक जिल्ह्यातील 1 हजार 24 शाळा आहेत त्यापैकी कोरोनामुक्त 335 गावातील 296 शाळा सुरू होणार आहेत. एका बेंचवर एकच विद्यार्थी या प्रमाणं विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. शाळेत रुग्ण सापडले तर शाळा तात्काळ बंद करण्यात येणार आहेत. नाशिक शहरातील शाळा सुरू करण्याचा अद्याप निर्णय नाही झालेला नाही.

59747 शाळा उघडल्या

राज्यात एकूण शाळांची संख्या 19997 असून त्यापैकी 5947 शाळा उघडण्यात आल्या. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची एकूण संख्या 45,07,445 असून त्यापैकी 4,16,599 विद्यार्थ्यांनी शाळेत आपली हजेरी नोंदवली, असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे

81 टक्के पालकांचा शाळा सुरु करण्याला कौल

कोरोनामुक्त गावांमध्ये आठवी ते बारावीच्या वर्गाबरोबरच अन्य वर्ग सुरू करण्यासाठी 81 टक्के पालकांनी होकार दर्शवला आहे. आवश्यक त्या खबरदारी घेऊन शाळा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याला जवळपास 5 लाख 60 हजार 819 पालकांनी सहमती दर्शवली असल्याचं दिनकर टेमकर यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर समोर आली आहे.

नाशिक जिल्ह्यात कलम 144 लागू

नाशिकमध्ये 18 तारखेच्या सकाळी म्हणजेच सोमवारी 7 वाजल्यापासून 31 तारखेच्या रात्री 12 वाजेपर्यंत लागू करण्यात आले आहेत. या दरम्यान जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे ,कोणतेही राजकिय,सामाजिक ,संस्कृती, शासकीय कार्यक्रमच्या निमित्ताने 5 किंवा 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्रित येण्यास मनाई करण्यात आली आहे. या संदर्भातील आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी काढले आहेत.

नाशिक कोरोना रिपोर्ट 17 जुलै

दिवसभरात पूर्ण बरे झालेले रुग्ण- 134

दिवसभरातील पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 138

नाशिक मनपा- 72 नाशिक ग्रामीण- 59 मालेगाव मनपा- 03 जिल्हा बाह्य- 04

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8466

दिवसभरातील मृत्यू:- 08 नाशिक मनपा- 02 मालेगाव मनपा- 00 नाशिक ग्रामीण- 06 जिल्हा बाह्य- 00

इतर बातम्या

मोठी बातमी, कोरोनामुक्त भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार, ठाकरे सरकारकडून शासन निर्णय जारी

भारतात केवळ 22 टक्के शाळांकडेच इंटरनेट सुविधा, शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीतूनच उघड

Nashik School Reopen from tomorrow in covid free villages of rural areas

निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?.
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज.
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.