नवी दिल्ली : कोरोना साथीरोगाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद पडल्यात. त्यावर उपाय म्हणून सरकार ऑनलाईन शिक्षणाचं धोरण ठरवतंय. मात्र, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीवरुन या ऑनलाईन शिक्षणाची पोलखोल झालीय. संपूर्ण देशात केवळ 22 टक्के शाळांकडेच इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे या शाळा ऑनलाई शिक्षणाचा वापर करुन शिकवण्याचं काम कसं करणार असा प्रश्न उपस्थित होतोय. 2019-20 या शैक्षणिक वर्षात एकूण सरकारी शाळांपैकी केवळ 12 टक्के शाळांकडे इंटरनेट सुविधा आहे. तसेच केवळ 30 टक्के शाळांकडे वापरता येतील अशा अवस्थेतील कम्प्युटर आहेत. त्यामुळे एकूणच कोरोना काळात अपुऱ्या सुविधांमुळे देशभरातील विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत असल्याचं दिसतंय (UDISE plus report disclose only 22 percent school in India have Internet facility).