AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gautam Gambhir : दिलदार गंभीर, वर्ल्ड कप विजयाचं 2 दिग्गजांना श्रेय, पत्रकार परिषेदत नाव घेत म्हणाला…, पाहा व्हीडिओ

Gautam Gambhir Press Conference : टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आणि गौतम गंभीर याच्या मार्गदर्शनात पहिला आणि एकूण तिसरा टी 20i वर्ल्ड कप जिंकला. हेड कोच गंभीर यांनी या विजयाचं श्रेय देताना कोणत्या 2 दिग्गजांची नावं घेतली? जाणून घ्या

Gautam Gambhir : दिलदार गंभीर, वर्ल्ड कप विजयाचं 2 दिग्गजांना श्रेय, पत्रकार परिषेदत नाव घेत म्हणाला..., पाहा व्हीडिओ
Gautam Gambhir and Suryakumar Yadav Team IndiaImage Credit source: Icc X account
| Updated on: Mar 09, 2026 | 7:50 AM
Share

टीम इंडियाने रविवारी 8 मार्चला सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात ऐतिहासिक असा टी 20i वर्ल्ड कप विजय मिळवला. भारताची टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याची ही एकूण तिसरी तर सलग दुसरी वेळ ठरली. भारताने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या या महाअंतिम सामन्यात न्यूझीलंडवर एकतर्फी विजय मिळवला. इंडिया यासह गतविजेता आणि यजमान म्हणून वर्ल्ड कप ट्रॉफी कायम ठेवणारी पहिली टीम ठरली. विजयानंतर हेड कोच गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव या दोघांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. गंभीरने या पत्रकार परिषदेत संबोधित करताना भारताच्या वर्ल्ड कप विजयाचं श्रेय दिग्गज जोडीला दिलं आहे. गंभीरने माजी प्रशिक्षक राहुल द्रविड आणि सीओई प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांना दिलं.

गौतम गंभीर काय म्हणाले?

“मी ही टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफी राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना समर्पित करतो”, असं गंभीरने म्हटलं. सूर्याने पत्रकार परिषदेत माजी हेड कोचचा राहुल भाई (राहुल द्रविड) असा उल्लेख केला.

“द्रविडने भारताला..

“द्रविडने भारताला एका चांगल्या स्थानी आणून ठेवलं. त्यांच्या मार्गदर्शनात भारतीय संघाने चांगली कामगिरी केली, विशेष करुन 2024 मध्ये टी 20i वर्ल्ड कप जिंकला”, असं गौतम गंभीर यांनी म्हटलं. सोबतच गंभीरने व्हीव्हीएस लक्ष्म्ण यांच्या सीओई प्रमुख म्हणून कामगिरीचं कौतुक केलं.

‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ प्रतिक्रिया

“लक्ष्मणने युवा खेळाडूंसाठी पूल तयार केला आहे. ते खेळाडू टीममध्ये येऊन चांगली कामगिरी करतात”, असं म्हणत गंभीरने लक्ष्मण खेळाडूंमागे घेत असलेल्या मेहनतीचं महत्त्व अधोरेखित केलं. तसेच गंभीरने निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांचेही आभार मानले. “त्यांच्यावर सोशल मीडियावरुन फार टीका झाली, मात्र त्यांनी त्यांची भूमिका प्रामाणिकपणे पार पाडली”, असं गंभीरने म्हटलं.

गंभीर-सूर्याची संयुक्त पत्रकार परिषद

सामन्यात काय झालं?

संजू सॅमसन याने सलग दुसऱ्यांदा केलेल्या 89 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडसमोर 256 रन्सचं टार्गेट ठेवलं. मात्र न्यूझीलंडला जिंकणं सोडा संपूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. भारताने न्यूझीलंडला 20 ओव्हरमध्ये 159 रन्सवर ऑलआऊट केलं. भारताने अशाप्रकारे टी 20i वर्ल्ड कप चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप