बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला…
बुलढाण्यात एका महिलेचा विनयभंग आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजप नगरसेवक आकाश दळवी यांच्यासह १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या वादातून ही घटना घडली असून, पीडितेच्या घरासमोर गोंधळ घालून दुचाकीची तोडफोडही करण्यात आल्याचा आरोप आहे.
बुलढाणा जिल्ह्यात एका महिलेचा विनयभंग करून शिवीगाळ केल्याच्या गंभीर आरोपावरून भाजप नगरसेवक आकाश दळवी यांच्यासह १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरात घुसून हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. जुन्या वादातून हा वाद विकोपाला गेला आणि पीडित महिलेच्या घरासमोर मोठा गोंधळ घालून दुचाकीची तोडफोड केल्याचेही या प्रकरणी समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आकाश दळवी आणि इतर १० ते ११ जणांनी घरात घुसून महिलेचा विनयभंग केला आणि तिला शिवीगाळ केली. एवढेच नाही, तर जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपींनी पीडितेच्या घरासमोर धुडगूस घातला आणि त्यांची दुचाकीही तोडली. या गंभीर प्रकारानंतर पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन विनयभंगासह इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
Published on: Sep 12, 2026 10:54 AM
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील

