कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ… गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
जळगावात मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्यात वयावरून शाब्दिक जुगलबंदी रंगली. गुलाबराव पाटील यांनी महाजनांना ज्येष्ठ वयोवृद्ध मंत्री असे संबोधले. यावर प्रत्युत्तर देत गिरीश महाजन यांनी, गुलाबरावांनी कितीही तरुण दिसण्याचा प्रयत्न केला तरी ते शक्य नाही, असे म्हटले. हा विनोदी संवाद उपस्थितांच्या चर्चेचा विषय ठरला.
जळगावमध्ये राजकीय वर्तुळात एक मजेदार प्रसंग घडला. राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांच्यात वयावरून शाब्दिक जुगलबंदी पाहायला मिळाली. हा दिलखुलास संवाद उपस्थितांमध्ये हास्याचे वातावरण निर्माण करणारा ठरला. या प्रसंगाची सुरुवात गुलाबराव पाटील यांनी केली. त्यांनी गिरीश महाजन यांचा उल्लेख ज्येष्ठ वयोवृद्ध मंत्री असा केला. गुलाबराव पाटील यांच्या या टिप्पणीनंतर, गिरीश महाजन यांनी तात्काळ आणि त्यांच्या नेहमीच्या विनोदी शैलीत प्रत्युत्तर दिले. महाजन म्हणाले, “ज्येष्ठ वयोवृद्ध मंत्री मी नाही म्हणत. नामदार गिरीशभाऊ महाजन.
आता कुठं बी गेले सगळे, सगळ्यात म्हणतात, पोलीस पाटील आहेत. कोण जेष्ठ वाटतं तुम्हाला? गुलाबराव वाटतो का मी? हसून दाखवा. लहान बंधू आणि भगिनींनो. तुम्ही लहान वाटता माझ्यापेक्षा.” महाजन पुढे असेही म्हणाले की, “गुलाबभाऊ, तुम्ही कितीही प्रयत्न करा तरुण व्हायचा, दाखवायचा, पण ते काही जमणार नाही.” दोन नेत्यांमधील हा दिलखुलास संवाद राजकीय कार्यक्रमात एक हलकेफुलके क्षण घेऊन आला आणि उपस्थितांचे मनोरंजन झाले.
Published on: Sep 12, 2026 09:54 AM
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...

