AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठी अभिनेत्याच्या पोस्टने खळबळ, थेट पोलिसांनी घेतली दखल, नेमकं काय घडलं?

एका प्रसिद्ध अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट पाहून थेट पोलिसांनी दखल घेतली आहे. त्यांनी अभिनेत्याच्या पत्नीला थेट फोन केला.

मराठी अभिनेत्याच्या पोस्टने खळबळ, थेट पोलिसांनी घेतली दखल, नेमकं काय घडलं?
Vikas SamudreImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 12, 2026 | 11:31 AM
Share

कलाकार हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते त्यांच्या आगमी सिनेमापासून ते खासगी आयुष्यापर्यंत सर्वाचे अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असतात. सध्या सोशल मीडियावर एका मराठमोळ्या अभिनेत्याने केलेल्या पोस्टने खळबळ माजली आहे. ही पोस्ट पाहून चाहते आणि मुंबई पोलिसांच्या पायाखालची जमीनही सरकली. आता हा अभिनेता कोण आहे? त्याची पोस्ट काय आहे? चला जाणून घेऊया…

कोण आहे हा अभिनेता?

प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता विकास समुद्रेने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने स्वत:चे जीवन संपवत असल्याचा मेसेज म्हटले होते. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली.

काय आहे पोस्ट?

विकास समुद्रे यांनी फेसबुकवर “I am committing Suicide…” अशी पोस्ट टाकली. या पोस्टमुळे पोलीस दलातही खळबळ उडाली. सायबर विभागाचे डीसीपी बजरंग बनसोडे यांनी तातडीने पावले उचलली आणि मुंबई पोलिसांनी अभिनेत्याशी त्वरित संपर्क साधला. मात्र, प्रकरण काहीतरी वेगळेच निघाले. अभिनेता पूर्णपणे सुखरुप असल्याचे आणि त्यांनी स्वत:ला संपवण्याचा अजिबात प्रयत्न केला नव्हता अशी माहिती समोर आली आहे.

विकास समुद्रे यांची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. अनेकांनी या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले, “अडचण असू शकते, पण हा मार्ग योग्य नाही, प्लीज असं काही करू नका…” तर दुसऱ्या युजरने म्हटले, “सर, काय झालं? काही प्रॉब्लेम असेल तर आपण काहीतरी मार्ग काढू शकतो. एवढ्या टोकाचं पाऊल उचलू नका…”

काही दिवसांपूर्वी एका पॉडकास्टमध्ये बोलताना विकास समुद्रे यांनी आपल्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळाबाबत भाष्य केले होते. अभिनेत्याला काही वर्षांपूर्वी ब्रेन हॅमरेज झाले होते. त्या काळातल्या कटू आठवणी त्यांनी शेअर केल्या होत्या. “अशी वेळ कोणावरच येऊ नये. हा काळ माझ्यासाठी खूप वाईट होता,” असेही त्यांनी पॉडकास्टमध्ये सांगितले होते.

कोण आहेत विकास समुद्रे?

विकास समुद्रे यांनी आजवर अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये काम केले आहे. मात्र, खरी प्रसिद्धी त्यांना ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटामुळे मिळाली. त्यांनी अनेक विनोदी भूमिकाही साकारल्या आहेत.

Follow Us
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका