Nashik Rain: पावसामुळे नाशिक जिल्हा टँकरमुक्त; 7 तालुक्यात 34 टँकर होते सुरू; नदी, धरणं तुडूंब

| Updated on: Jul 15, 2022 | 4:22 PM

नाशिकमधील अनेक गाावांमध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस लांबला होता. त्यामुळे पाऊस नसलेल्या गावातील लोक चिंताग्रस्त झाले होते. त्यामुळे ऐन पावसातही 40 गावं आणि वाड्यांवस्त्यांतील नागरिकांना 34 टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. पाणी नसल्याने महिलांचेही प्रचंड हाल होत होते.

Nashik Rain: पावसामुळे नाशिक जिल्हा टँकरमुक्त; 7 तालुक्यात 34 टँकर होते सुरू; नदी, धरणं तुडूंब
Follow us on

नाशिक : राज्यात सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे, अनेक जिल्ह्यातील नद्यांना पूर येऊन पाणी रस्त्यावर आहे. त्यामुळे अनेक जिल्हे पूरमय झाले असले तरी मुसळधार पावसाचा फायदा नाशिक जिल्ह्याला (Nashik Rain) झाला आहे. नाशिक जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरू असून येथील नद्या-नाल्यांना जोरदार पूर आला आहे. येथील धरणांच्या पाणीपातळीतही वाढ झाली असून जिल्हा प्रशासनाकडून मंगळवारी सात तालुक्यामधील 34 टँकर बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे आता जिल्हा टँकरमुक्त (Tanker Free) झाला आहे.

जिल्ह्यातील 40 गावांना 34 टँकर

नाशिकमधील अनेक गाावांमध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस लांबला होता. त्यामुळे पाऊस नसलेल्या गावातील लोक चिंताग्रस्त झाले होते. त्यामुळे ऐन पावसातही 40 गावं आणि वाड्यांवस्त्यांतील नागरिकांना 34 टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. पाणी नसल्याने महिलांचेही प्रचंड हाल होत होते.

विहिरींच्या पाणी पातळीत वाढ

गेल्या पाच दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली असून अजूनही पाऊस सुरुच आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक नद्या नाले वाहू लागले आहेत. अनेक गावातून असलेल्या विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तर जिल्ह्यात असणाऱ्या धरणांची पाणी पातळीत वाढ होऊन 65 टक्क्यांपेक्षा अधिक धरणे भरली आहेत
भूगर्भातील पाण्याचे स्रोत पुनरुज्जीवित झाले असल्याने प्रशासनाकडून पाण्याचा आढावा घेऊन जिल्ह्यात सुरू असलेले पाण्याचे टँकर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

उन्हाळ्यात तब्बल 84 टँकर

यंदाच्या मे महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात प्रचंड उष्णतेचे प्रमाण होते, यावेळी नाशिक जिल्ह्याचे तापमान 41 अंशांपलीकडे गेले होते. तापमान वाढीचा जिल्ह्यातील अनेक गावांना बसला होता. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाने टँकर सुरू केले होते. त्यावेळी तब्बल 84 टँकरच्या माध्यमातून 150 हून अधिक गावे आणि वाड्यांना पाणीपुरवठा केला जात होता. त्यामध्ये येवल्यामध्ये सर्वाधिक टँकर सुरू करण्यात आले होते.