Nashik Job: नाशिकमध्ये नोकरभरती मेळावा; कसे व्हाल सहभागी, घ्या जाणून…!

| Updated on: Apr 18, 2022 | 3:29 PM

नाशिकमध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाइन रोजगार मेळावा 26 ते 28 एप्रिल कालावधीत होणार आहे. यामधील मुलाखती या मोबाइल, दूरध्वनी, व्हिडीओ कॉन्फरन्स, स्काइप, व्हॉट्अॅप इत्यादी माध्यमांद्वारे घेण्यात येणार आहेत. या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Nashik Job: नाशिकमध्ये नोकरभरती मेळावा; कसे व्हाल सहभागी, घ्या जाणून...!
महाराष्ट्र डाक विभागात नोकरी !
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) शिकाऊ उमेदवारांसाठी नोकरभरती (Recruitment) मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुलभूत औद्योगिक प्रशिक्षण संस्था तथा अनुषंगिक सूचना केंद्राद्वारे जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था सातपूर (Satpur) येथे 21 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता हा मेळावा होणार आहे, अशी माहिती सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार आर. एस. उनवणे यांनी दिली आहे. या शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील आय. टी. आय. उत्तीर्ण उमेदवारांना अप्रेंटिशिप नियुक्तीची संधी उपलब्ध होणार आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील आय.टी.आय. उत्तीर्ण इच्छुक उमेदवारांनी कागदपत्रांच्या मूळ प्रती व त्यांच्या दोन छायांकित प्रतीसह औद्योगिक प्रशिक्षण संस्था सातपूर येथे, नाशिक-7 येथे दिलेल्या वेळेत उपस्थितीत रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, दुसरीकडे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे हा मेळावा होणार आहे.

ऑनलाइन रोजगार मेळावा

पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाइन रोजगार मेळावा 26 ते 28 एप्रिल कालावधीत होणार आहे. यामधील मुलाखती या मोबाइल, दूरध्वनी, व्हिडीओ कॉन्फरन्स, स्काइप, व्हॉट्अॅप इत्यादी माध्यमांद्वारे घेण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप सेवा योजना नोंदणी केली नसेल, अशा उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा अँण्ड्रॉइड मोबाइलधारकांनी प्ले स्टोअरमधून mahaswayam हे ॲप डाऊनलोड करून नोंदणी करावी, असे आवाहन केले आहे.

कसा कराल अर्ज?

ऑनलाइन रोजगार मेळव्यासाठी महास्वयम वेब पोर्टलवर पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फायर या ऑप्शनवर क्लिक करुन नाशिक ऑनलाइन जॉब फायर -1 (2022-23) यावर जनरल, ईपीपी, ॲप्रेटिंस आदी रिक्तपदे अधिसूचित करावी. तसेच सदर मनुष्यबळाच्या मागणीची जाहिरात व प्रसिद्धी विभागावरील वेबपोर्टलवर विनामूल्य करावी, असे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी 0253-2993321 या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधता येईल.

ज्या उमेदवारांनी अद्याप सेवा योजना नोंदणी केली नसेल, अशा उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा अँण्ड्रॉइड मोबाइलधारकांनी प्ले स्टोअरमधून mahaswayam हे ॲप डाऊनलोड करून नोंदणी करावी.

– अनिसा तडवी, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास विभाग

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!