Nashik Loksabha : नाशिकमध्ये काय चाललय? हेमंत गोडसे यांच्या कृतीचा नेमका अर्थ काय?

| Updated on: Mar 30, 2024 | 12:38 PM

नाशिकवरुन महायुतीमध्ये मिठाचा खडा पडणार का? सध्या तरी राजकीय चित्र तसच दिसतय. शिवसेना शिंदे गटात सध्या अस्वस्थतता आहे. शिंदे गटाच्या बऱ्याचशा नेत्यांच तिकीट अजून पक्क होत नाहीय. भाजपाकडून त्या जागांवर दावा सांगितला जातोय.

Nashik Loksabha : नाशिकमध्ये काय चाललय? हेमंत गोडसे यांच्या कृतीचा नेमका अर्थ काय?
hemant godse
Follow us on

महायुतीकडून अद्याप पूर्णपणे जागावाटप जाहीर झालेलं नाही. काही जागांवरुन तीव्र मतभेद आहेत. यात छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकची जागा आहे. नाशिकमधून लोकसभेला महायुतीचा उमेदवार कोण असणार? यावरुन अजूनही संभ्रम कायम आहे. विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी पूर्ण राजकीय ताकद पणाला लावली आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ नाशिकमधून उमेदवार असणार, त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे, अशा सुद्धा बातम्या येत आहेत. त्यामुळे नाशिकवरुन महायुतीमध्ये मिठाचा खडा पडणार का? सध्या तरी राजकीय चित्र तसच दिसतय. शिवसेना शिंदे गटात सध्या अस्वस्थतता आहे. शिंदे गटाच्या बऱ्याचशा नेत्यांच तिकीट अजून पक्क होत नाहीय. भाजपाकडून त्या जागांवर दावा सांगितला जातोय. त्यासाठी सर्वेच कारण पुढे केलं जातय. आता शिंदे गटाचे नेते त्या सर्वेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करतायत.

नाशिक लोकसभेच्या जागेवर दावा सांगणारे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. उमेदवारी निश्चित नसतानाही त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. रंगपंचमीचे औचित्य साधून हनुमानाच्या मंदिरात पूजा विधी करत प्रचाराचे नारळ फोडले. रंगांची उधळण करत हेमंत गोडसे यांच्याकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि हेमंत गोडसे समर्थकांकडून प्रचाराला करण्यात आली सुरुवात. खासदार हेमंत गोडसेंचं आज नाशकात शक्तिप्रदर्शन सुरु आहे.

काही प्रश्न निर्माण झाले

आता हेमंत गोडसे यांनी परस्पर प्रचाराला सुरुवात केल्याने काही प्रश्न निर्माण होतायत. हेमंत गोडसे यांना मुख्यमंत्र्यांकडून नाशिकच्या जागेचा ग्रीन सिग्नल मिळालाय का? की, हेमंत गोडसे शक्तिप्रदर्शन करुन बंडाचे संकेत देत आहेत का? महायुतीकडून उमेदवारी मिळावी यासाठी गोडसे मुंबईत तळ ठोकून होते. मुख्यमंत्र्यांच्या निवस्थानाच्या बाहेर दोन वेळेला गोडसेंनी शक्तिप्रदर्शन केलय. मंत्री छगन भुजबळ हे महायुतीचे उमेदवार असणार अशी चर्चा सुरू झाल्यानं शिवसैनिकांसह गोडसे अस्वस्थ आहेत.