Nashik Loksabha : नाशिकच्या उमेदवारीवर छगन भुजबळ यांचं मोठं विधान; म्हणाले, आम्ही सगळे…

| Updated on: Apr 01, 2024 | 11:44 AM

नाशिकमधून छगन भुजबळ महायुतीचे उमेदवार असणार असं बोलल जातय. नेमकी नाशिकची जागा कोणाला मिळणार? याची उत्सुक्ता आता ताणली गेली आहे. एकप्रकारे हे प्रतिष्ठेचा विषय बनलाय.

Nashik Loksabha : नाशिकच्या उमेदवारीवर छगन भुजबळ यांचं मोठं विधान; म्हणाले, आम्ही सगळे...
Nashik Chhagan Bhujbal May Contest Lok Sabha Election 2024 NCP Ajiy Pawar Group Latest Marathi News
Follow us on

महायुतीमध्ये नाशिक लोकसभेची जागा कळीचा मुद्दा ठरली आहे. त्यामुळे अजूनही नाशिकमधून उमेदवारी जाहीर होत नाहीय. नाशिकच्या जागेवर शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस तिघांकडून दावा सांगितला जातोय. नाशिकमध्ये विद्यमान खासदार शिवसेनेचा आहे. हेमंत गोडसे नाशिकधून खासदार आहेत. नाशिकचा पेच अजून सुटत नाहीय. त्यासाठी बैठकांवर बैठका सुरु आहेत. नाशिकमधून उमेदवारी जाहीर झालेली नसताना हेमंत गोडसे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. शनिवारी हेमंत गोडसे यांनी प्रचार सुरु केला. त्यावरुन काही प्रश्न निर्माण झाले. हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळणार हा ग्रीन सिग्नल मिळालाय की ते शक्ती प्रदर्शनाद्वारे बंडाचे संकेत देत आहेत.

नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात सध्या भाजपाच वर्चस्व आहे. त्यांच्या आमदार-खासदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे नाशिक लोकसभेच्या जागेवर भाजपाकडून दावा सांगितला जातोय. नाशिकमधून छगन भुजबळ यांच्या उमेदवारीची सुद्धा चर्चा आहे. नाशिकमधून छगन भुजबळ महायुतीचे उमेदवार असणार असं बोलल जातय. नेमकी नाशिकची जागा कोणाला मिळणार? याची उत्सुक्ता आता ताणली गेली आहे. एकप्रकारे हे प्रतिष्ठेचा विषय बनलाय. शिंदे गट नाशिकच्या जागेवरील आपला दावा मागे घ्यायला तयार नाहीय.

नाशिकच्या जागेबद्दल छगन भुजबळ काय म्हणाले?

दरम्यान आज छगन भुजबळ यांनी नाशिकची जागा कोणाला मिळणार? या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली. गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील या भाजपा नेत्यांची बैठक झाली. त्यांनी नाशिकच्या जागेवर दावा केलाय, असा प्रश्न पत्रकारांनी छगन भुजबळ यांना विचारला. त्यावर ते म्हणाले की, “शिंदे गटाचे हेमंत गोडसे विद्यमान खासदार आहेत, त्यांनी प्रयत्न करण्यात अजिबात चूक नाही. भाजपाचे 100 च्या वर नगसेवक, आमदार आहेत. त्यांनी सुद्धा प्रयत्न करण चूक नाही. ज्याला कोणाला तिकीच मिळेल, त्याच्यासाठी आम्ही सर्व मिळून मनापासून प्रयत्न करु”