कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाच्या धाडी, कांद्याचे दर 15 रुपयांनी घसरले

| Updated on: Oct 25, 2021 | 11:16 AM

पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये 2 दिवसांपूर्वी कांदा व्यापाऱ्यांकडे आयकर विभागाने धाड टाकली होती. यामुळे मुंबई एपीएमसी कांदा बटाटा मार्केटमध्ये कांद्याच्या दरात 15 रुपयांनी घसरण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी 40 रुपये किलो विकला जाणारा कांदा आज 25 रुपये किलोने विकला जात आहे.

कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाच्या धाडी, कांद्याचे दर 15 रुपयांनी घसरले
मुंबई एपीएमसीतील कांदा-बटाटा मालाच्या गोणीचे वजन 50 किलोच राहणार
Follow us on

नवी मुंबई : पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये 2 दिवसांपूर्वी कांदा व्यापाऱ्यांकडे आयकर विभागाने धाड टाकली होती. यामुळे मुंबई एपीएमसी कांदा बटाटा मार्केटमध्ये कांद्याच्या दरात 15 रुपयांनी घसरण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी 40 रुपये किलो विकला जाणारा कांदा आज 25 रुपये किलोने विकला जात आहे. मुंबई एपीएमसी कांदा बटाटा घाऊक बाजारा आज कांद्याची आवक 100 गाडी इतकी झाली आहे.

केंद्र सरकारच्या आयकर विभागाच्या वतीने पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीतील 6 कांदा व्यापाऱ्यांच्या 13 ठिकाणी गुरुवारी छापे टाकण्यात आले होते. सुमारे दीडशे ते दोनशे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या व्यापाऱ्यांचे कार्यालय आणि बँक खात्यांची तपासणी केली. आयकर विभागाने रोख रक्कमही जप्त केली. हा पैसा मोजण्यासाठी तब्बल 80 अधिकारी होते. त्यांनी नाशिक, पिंपळगावमधील बँकामध्ये जवळपास 18 तास रोकड मोजली. दरम्यान, या कारवाईमुळे मार्केटमध्ये नियंत्रण आल्याची माहिती काही व्यपाऱ्याने सांगितले.

भाववाढ नियंत्रणात आणण्यासाठी कारवाई?

अतिवृष्टी, मुसळधार पावसामुळे शेतात लागवड केलेल्या कांद्याची रोपे खराब झाली आहेत. बदलत्या हवामानाचा फटका हा चाळीत साठवलेल्या उन्हाळ कांद्यालाही बसल्याने मोठ्या प्रमाणात कांद्याचे नुकसान झाले आहे. यामुळे देशांतर्गत मागणी आणि पुरवठा यात तफावत निर्माण झाल्यामुळे देशांतर्गत कांद्याच्या बाजारभावात गेल्या आठवड्यात वाढ होत कांद्याचे बाजार भाव लासलगाव, पिंपळगाव बाजार समितीमध्ये चार हजार रुपयांच्यावर गेले होते.

त्यामुळे किरकोळ बाजारात दिवाळीच्या तोंडावर कांद्याच्या बाजार भावाचा भडका उडाला आणि ऐन सणासुदीच्या काळात भाव वाढली त्यामुळे आयकर विभागातर्फे 13 ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यामुळे बाजार साध्य नियंत्रणात आली आहे. यामध्ये असे दिसून येत आहे की कांदा व्यपारी कांदा साठवणूक करुन भाव वाढवले जात होते.

भाज्यांचे दर गगनाला भिडले

मुंबईत ऐन दिवाळीच्या तोंडावर भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. अवकाळी पाऊस आणि आवक घटल्याचा थेट परिणाम भाज्यांच्या दरवाढीवर झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचं आर्थिक बजेट बिघडलं आहे. जर भाज्या इतक्या महाग झाल्या तर खायचं काय हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

परतीच्या पावसाने अन्य जिल्ह्यातील शेतीचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे सध्या पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येणाऱ्या भाज्यांचे दर देखिल कडाडलेत. सध्या पेट्रोल डिझेलपेक्षा मटार महाग झालाय. मटार 120 रुपये कोलो दरांनी विकला जातोय. टोमॅटो, कांदा आणि कोथिबीरीच्या दरांनी पन्नाशी उलटलीये.

संबंधित बातम्या :

भाज्यांनी गाठली शंभरी, औरंगाबादकर हैराण, म्हणतात आता काही दिवस डाळ अन् कडधान्येच खाणार!

राज्यातील सर्वात महाग कोथिंबीर नागपुरात, किलोचा दर तब्बल…