गरजूंना मदतीचा हात देताना कोरोनाने गाठलं, दोन महिन्यांच्या उपचारानंतर भाजप नगरसेवकाचं निधन

| Updated on: Mar 18, 2021 | 11:27 AM

Sanjay Bhopi : पनवेल महानगरपालिकेतील (Panvel Municipal corporation) भाजपचे विद्यमान नगरसेवक संजय भोपी (BJP corporator Sanjay Bhopi) यांचे कोरोनामुळे निधन झाले.

गरजूंना मदतीचा हात देताना कोरोनाने गाठलं, दोन महिन्यांच्या उपचारानंतर भाजप नगरसेवकाचं निधन
BJP corporator Sanjay Bhopi
Follow us on

नवी मुंबई : कोरोनाकाळात गरजूंना हात देणाऱ्या नगरसेवकाचा कोरोनामुळेच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पनवेल महानगरपालिकेतील (Panvel Municipal corporation) भाजपचे विद्यमान नगरसेवक संजय भोपी (BJP corporator Sanjay Bhopi) यांचे कोरोनामुळे निधन झाले. गेल्या दोन महीन्यापासून ते रुग्णालयात उपचार घेत होते. कोरोनाची लागण झाल्याने ते आजारी होते. त्यातून ते बाहेर पडले मात्र, कोरोनामुळे त्यांच्या फुफुसे निकामी झाल्याने उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. (Panvel BJP corporator Sanjay Bhopi died due to coronavirus covid19 cases in Navi mumbai)

कोरोनाच्या काळात त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी मधून प्रभावी काम केले. गोरगरीब गरजूंना मदतीचा हात दिला. हे करत असताना त्यांना कोरोनाविषाणूचा संसर्ग झाला. संजय भोपी यांना उपचारासाठी अपोलो हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. त्याठिकाणी प्रकृती सुद्धा सुधारणा झाली. परंतु त्यानंतर पुन्हा प्रकृती खालावली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वतः लक्ष घालून त्यांना उपचारासाठी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची आपल्या जीवनाबरोबर लढाई सुरु होती. अखेर या लढवय्या लोकप्रतिनिधी प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी शोक व्यक्त केला आहे.

राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे, राज्यातील बहुतांश जिल्ह्यात कडक निर्बंध लादण्यात आले असून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे, प्रशासकीय यंत्रणा कोरोनाविरुद्धच्या लढाईला पुन्हा सज्ज झाली आहे.

 आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रतिक्रिया 

“आज सकाळी माझे सहकारी मित्र तसेच पनवेल महानगरपालिकेचे मा. ‘ ब’ प्रभाग समिती सभापती आणि नगरसेवक संजय दिनकर भोपी यांच्या निधनाची बातमी समजातच खुप दु:ख झाले. समाजासाठी दिवस रात्र मेहनत करून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी कार्यरत रहाणारे, कुठलीही जवाबदारी स्वतःचे काम समजून ती यशस्वी करण्यासाठी धड़पडणारे, सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे, प्रत्येकाला सकारात्मक ऊर्जा देणारे, सर्व वयोगटात मिसळून काम करणारे नेतृत्व म्हणजेच संजय भोपी सुपरिचित होते. त्यांच्या निधनाने राजकारण आणि समाजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे कुटुंबीय, आप्त परिवार आणि सर्वच कार्यकर्त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी मी प्रार्थना करतो” अशी प्रतिक्रिया भाजपम आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली.

संजय भोपी तळमळीने काम करणारा लोकप्रतिनिधी – लोकनेते रामशेठ ठाकूर

महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवक संजय भोपी यांनी नेहमीच राजकारण विरहित काम केले आहे. सामाजिक कार्यातही त्यांचे काम उदंड होते. एक सामान्य कार्यकर्ता ते उत्कृष्ट लोकप्रतिनिधी, समाजसेवक म्हणून त्यांनी आपल्या कार्यातून स्वतःची चांगली प्रतिमा समाजात निर्माण केली. दांडगा जनसंपर्क, मोठा मित्रपरिवार, मितभाषी, संवेदनशील, प्रेमळ आणि मनमिळावू असे त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये होती. नगरसेवक संजय भोपी यांच्या निधनाने एक चांगला लोकप्रतिनिधी आणि सहकारी आम्ही गमावला आहे, असं लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले.

(Panvel BJP corporator Sanjay Bhopi died due to coronavirus covid19 cases in Navi mumbai)

संबंधित बातम्या  

Maharashtra Corona Update : 24 तासांमध्ये कोरोनाचा उद्रेक, ताज्या आकड्यांनी चिंता वाढवली

Pune Lockdown Updates : पुण्यात एकाच दिवशी 2500 रुग्ण, महापालिका प्रशासन हादरलं, हे असतील नवे निर्बंध?