Maharashtra Corona Update : 24 तासांमध्ये कोरोनाचा उद्रेक, ताज्या आकड्यांनी चिंता वाढवली

सर्वात जास्त नागपूर, मुंबई आणि पुण्यात याची नोंद करण्यात आली आहे. 17 मार्चला नागपूर कोरोना लॉकडाउनमध्ये (Nagpur Corona Lockdown) कोरोना संसर्गाच्या 3370 नवीन घटना समोर आल्या असून 16 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Maharashtra Corona Update : 24 तासांमध्ये कोरोनाचा उद्रेक, ताज्या आकड्यांनी चिंता वाढवली
Follow us
| Updated on: Mar 18, 2021 | 9:16 AM

मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra Corona Update) लागू केलेल्या निर्बंधांच्या बाबत कोरोना संसर्गाची नवीन प्रकरणे सतत वाढत आहेत. गेल्या 24 तासांत राज्यात 23,179 नवीन संसर्गाच्या घटना घडल्या असून यामुळे 84 लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वात जास्त नागपूर, मुंबई आणि पुण्यात याची नोंद करण्यात आली आहे. 17 मार्चला नागपूर कोरोना लॉकडाउनमध्ये (Nagpur Corona Lockdown) कोरोना संसर्गाच्या 3370 नवीन घटना समोर आल्या असून 16 लोकांचा मृत्यू झाला आहे. (maharashtra corona updates new covid cases increase in last 24 hours corona blast in nagpur)

राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे 53,080 लोकांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोरोना लस देण्यासाठी तातडीने परवानगी देण्याची मागणी केली होती.

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी सांगितले की, लसीकरणाला वेग आला आहे. यासाठी कोरोना लसीचे 2.20 कोटी डोस केंद्र सरकारकडे मागविले गेले आहेत. टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना पत्र लिहिले असून दर आठवड्याला 20 लाख डोस राज्यांना उपलब्ध करुन देण्यात यावेत अशी मागणी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी कोरोनामधील परिस्थितीविषयी अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत बैठकही केली. त्यांनी कोरोना मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी आणि लसीकरण कार्यक्रमास वेग देण्याची मागणी मोदींनी सर्व राज्यांकडून केली आहे.

दरम्यान, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा कहर सुरूच आहे. आज दिवसभरात तब्बल 318 रुग्णांची वाढ तर तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोना बाधितांची एकूण संख्या 58 हजार 218, सक्रिय बाधित संख्या 2012 असून एकूण मृत्यूची संख्या 1144 वर पोहोचली आहे.

पुण्यात दिवसभरात 2587 रुग्ण वाढले आहेत तर दिवसभरात 769 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात करोनाबाधीत 16 रुग्णांचा मृत्यू झाला असून 425 रुग्ण क्रिटिकल आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 223797

नाशिकमध्ये 24 तासात कोरोना रुग्णसंख्येत रेकॉर्डब्रेक वाढ झाली आहे. काल दिवसभरात जिल्ह्यात तब्बल 2146 जणांना कोरोनाची लागण तर 9 रुग्ण दगावले आहेत. नाशिक शहरात 1296, नाशिक ग्रामीण 631, मालेगाव मनपा 174, जिल्हा बाह्य 45 रुग्ण समोर आले आहेत. (maharashtra corona updates new covid cases increase in last 24 hours corona blast in nagpur)

संबंधित बातम्या – 

Corona Update : देशातील एकूण रुग्णांपैकी 60 टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात! कोणत्या जिल्ह्यांमध्ये चिंताजनक स्थिती?

मुंबईत मोठ्या घडामोडी, देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेत्यांची फौज अमित शहांच्या भेटीला, कारण काय?

महाराष्ट्रासाठी मोठी बातमी, मुंबईतील ‘या’ संस्थेत कोविड लस निर्मिती करणार, अमित देशमुखांची मोठी घोषणा

(maharashtra corona updates new covid cases increase in last 24 hours corona blast in nagpur)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.