पनवेलकरांचा अपेक्षाभंग! आठवण्यातून एकदा पाणीकपात, पालिकेच्या निर्णयानं पनवेलकर हवालदिल

| Updated on: Feb 13, 2022 | 9:32 PM

Water Problem in Panvel : पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी रामदाय तायडे यांनी दिलेल्या माहितीनुसरा बुधवार, शनिवार आणि रविवार या दिवशी सर्व भागात सुरळीत पाणी पुरवठा असेल. मात्र इतर दिवशी पाणी कपात करण्यात येणार आहे.

पनवेलकरांचा अपेक्षाभंग! आठवण्यातून एकदा पाणीकपात, पालिकेच्या निर्णयानं पनवेलकर हवालदिल
नळावर पाणी भरण्यावरून शेजाऱ्यांमध्ये वाद
Image Credit source: TV9
Follow us on

पनवेल : पाणी कपातीबाबत पनवेल महापालिकेनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पनवेल महापालिका क्षेत्रात एक दिवस पाणीकपात केली जाणार आहे. पावसाळ्यापूर्वी पाण्याची (Water issue in Panvel) कमतरता भासू नये, यासाठी पाणी कपात करण्यात आल्याचं बोललं जातंय. उन्हाळ्यापर्यंत पनवेलकरांना उपलब्ध पाणीसाठ्यानुसार (Water Shortage) पाणी दिल्यास पाण्याची कमतरता भासू शकते, अशी भीती व्यक्त केली जाते आहे. त्यामुळे पालिकेनं खबरदारी म्हणून वेळीच सावधगिरी बाळगण्यासाठी पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उन्हाळ्यापर्यंत पाण्याचं नियोजन करुन पाणीटंचाई थोपवली जात असल्याचंही बोललं जातंय. गेल्या दोन वर्षांत पाण्याबाबत पनवेलकरांमध्ये पाण्याच्या बाबतीत कोणतीही तक्रार आलेली नसल्यानं हा निर्णय घेतला गेला असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, पालिकेनं (Panvel Municipality) घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य याववरुनही चर्चांना उधाण आलंय.

…म्हणून पाणीकपात!

पनवेल शहरात दिवसाला 30 ते 32 एमएमलडी पाणी लागतं. देहरंग धरणातून दिवसाला सात ते आठ एमएलडी पाणी घेण्यात येतं. एमजेपीकडून 9 ते 10 एमएलडी पाणी मिळतं. तर एमआयडीसीकडून मिळणाऱ्या 5-6 एमएलडी पाणी उपलब्ध होतं. यातून सध्या देहरंग धरणातील पाणी शहराला पावसाळ्यापर्यंत पुरावं यासाठी पाणी कपातीचं निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जातंय.

या वेळेलाच पाणी भरुन घेत चला!

पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी रामदाय तायडे यांनी दिलेल्या माहितीनुसरा बुधवार, शनिवार आणि रविवार या दिवशी सर्व भागात सुरळीत पाणी पुरवठा असेल. मात्र इतर दिवशी पाणी कपात करण्यात येणार आहे. तसंच शहरातील उंच जलकुंभनिहाय भागातही आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. विभागनिहाय आठव्यातून एक दिवस पामीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.

धरणाची पाणी क्षमता खालावली!

पनवेल शहराला देहरंग धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र या धरणाची पाणी साठवण क्षमता खालावली असल्याचंही बोललं जातंय. धरणातील गाळ अनेक वर्षांपासून काढला नसल्यानं या धरणातील पाणी धारण क्षमता कमी झाली असून याचा परिणाम पालिकेतर्फे केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यावर होतोय. त्यामुळे नागरिकांना नाहक मनस्तापाला सामोरं जावं लागतंय.

खरंतर यंदा अतिवृष्टीमुळे पाण्याची समस्या उद्भवणार नाही, अशी अपेक्षा पनवेलकरांना होती. मात्र पाणी कपातीच्या निर्णयाचनं पनवेलकरांचा अपेक्षाभंग झाला असून आता दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पनवेलकरांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे लोकांनाही आता पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं जातंय.

संबंधित बातम्या :

पनवेलमध्ये वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, सहा मुलींची सुटका, दोन आरोपींना अटक

पनवेल : बस सेवा बंदचा प्रवाशांना फटका; खासगी वाहतूकदारांकडून भाड्याची दुपटीने वसुली

VIDEO : Salman Khan चालवतोय ऑटोरिक्षा, पनवेलमधला व्हिडिओ Viral