पनवेलमध्ये वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, सहा मुलींची सुटका, दोन आरोपींना अटक

पनवेलमधून (Panvel)  एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वेश्या व्यवसायासाठी (prostitution) आणलेल्या सहा मुलींची पोलिसांनी सुटका केली आहे. या मुली राजस्थान (Rajasthan) आणि उत्तर प्रदेशमधून शहरात आणण्यात आल्या होत्या.

पनवेलमध्ये वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, सहा मुलींची सुटका, दोन आरोपींना अटक
Follow us
| Updated on: Feb 03, 2022 | 10:20 PM

पनवेल : पनवेलमधून (Panvel)  एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वेश्या व्यवसायासाठी (prostitution) आणलेल्या सहा मुलींची पोलिसांनी सुटका केली आहे. या मुली राजस्थान (Rajasthan) आणि उत्तर प्रदेशमधून शहरात आणण्यात आल्या होत्या. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात देह विक्रीचा व्यवसाय सुरू होता. या प्रकरणातील आरोपी हे संबंधित मुलीचा फोटो ग्राहकांना दाखवून त्यांचा सौदा करायचे. या प्रकरणाची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपींना खांदा कॉलनी परिसरातून अटक करण्यात आली आहे. आरोपींची चौकशी सुरू असून, या प्रकरणात अन्य किती जणांचा सहभाग आहे याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सहा मुलींची सुटका

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, शहरात गेल्या अनेक दिवसांपासून वेश्या व्यावसाय सुरू होता. देह विक्रीसाठी राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधून मुली शहरात आणल्या जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार  अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने सापळा रचण्यात आला. याप्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, सहा मुलींची सुटका करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान या प्रकरणात आणखी किती जणांचा सहभाग आहे याचाही शोध घेतला जात आहे.

राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधून मुलींची तस्करी

गेल्या अनेक दिवसांपासून शहरात देह विक्रीचा व्यवसाय सुरू होता. आरोपी देह विक्रिसाठी राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधून महिला आणि मुली आणत होते. त्यानंतर आरोपी संबंधित ग्राहकाला मुलीचा फोटो दाखवत होते. फोटो दाखवल्यानंतर डील करायचे. मात्र याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी मोठ्या शिताफीने दोन आरोपींना अटक करत सहा मुलींची सुटका केली आहे.

संबंधित बातम्या

दरोड्याच्या उद्देशाने घरावर आठ ते दहा जणांचा हल्ला; फायरिंगही केली, घटना सीसीटीव्हीत कैद

Suvarna Waje Murder : नाशिकमधील डॉ. सुवर्णा वाजे मृत्यूप्रकरणी धक्कादायक खुलासा, कौटुंबिक वादातून पतीनेच केली हत्या

Pimpri Chinchwad crime| थेरगाव क्वीनबरोबर धमकीचे व्हिडीओ काढणाऱ्या कुणाल कांबळेच्या  पोलिसांनी मुसक्या आवळल्या

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.