दरोड्याच्या उद्देशाने घरावर आठ ते दहा जणांचा हल्ला; फायरिंगही केली, घटना सीसीटीव्हीत कैद

कामठी  पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका शेतातील घरावर रात्रीच्या वेळी आठ ते दहा जणांनी अचानक हल्ला केला. हा हल्ला दरोड्याच्या उद्देशाने करण्यात आला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.

दरोड्याच्या उद्देशाने घरावर आठ ते दहा जणांचा हल्ला; फायरिंगही केली, घटना सीसीटीव्हीत कैद
nagpur crime
Follow us
| Updated on: Feb 03, 2022 | 5:40 PM

नागपूर : जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कामठी  पोलीस स्टेशनच्या (Kamathi Police Station) हद्दीत असलेल्या एका शेतातील घरावर रात्रीच्या वेळी आठ ते दहा जणांनी अचानक हल्ला(Attack) केला. हा हल्ला दरोड्याच्या (Robbery) उद्देशाने करण्यात आला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. आरोपींनी यावेळी फायरिंग करत दहशत माजवली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. नवी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत नागपूर -जबलपूर हायवेवर यशपाल शर्मा यांचे शेतात घर आहे. त्यांच्या शेतातील घरावर हा हल्ला करण्यात आला. या प्रकाराने परिसरात खळबळ माजली  आहे. मात्र दरोड्याचा प्रयत्न फसल्याने संबंधित आरोपींनी घटनास्थळावरू पळ काढला.

दगडफेक देखील केली

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नवी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत नागपूर जबलपूर हायवे वर यशपाल शर्मा यांचे शेत आहे. हे शेत आवंडी गावापासून अवघ्या एक किलोमिटर अंतरावर आहे. या शेतात शर्मा यांचे एकटेच घर आहे. शेताच्या आसपास काही अंतरावर मजुरांची घरे आहेत. रात्रीच्या सुमारास आठ ते दहा जणांनी शर्मा यांच्या घरावर हल्ला केला. हा हल्ला दरोड्याच्या उद्देशाने करण्यात आला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. यावेळी आरोपींनी फायरिंग देखील केली. फायरिंगचा आवाज  ऐकूण शेतात काम करणारे मजूर बाहेर आले, मात्र समोरचे दृष्य बघून ते परत घरात गेले. आरोपींनी फायरिंग करत दगडफेक देखील केली. मात्र घारत शिरण्यात अपयश आल्याने हल्लेखोर पुन्हा परतले. हा सर्व प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

पोलिसांकडून आरोपींचा शोध 

दरम्यान आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलीस संबंधित आरोपींचा शोध घेत आहेत. शेतात एकटेच घर असल्याचे पाहून आरोपींनी घरावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला असावा असा प्राथमिक अंदाज असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. मात्र त्यांचा हा प्रयत्न अयश्वस्वी झाल्याने त्यांनी घटनास्थळावरून पलायन केले. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संबंधित बातम्या

Pimpri Chinchwad crime| थेरगाव क्वीनबरोबर धमकीचे व्हिडीओ काढणाऱ्या कुणाल कांबळेच्या  पोलिसांनी मुसक्या आवळल्या

HoneyTrap : राजस्थानच्या महसूल मंत्र्यांना हनीट्रॅपमध्ये अडकविण्याचा डाव, मॅाडेलचा आत्महत्येचा प्रयत्न

Pune Crime | पत्नीच्या हत्येची शिक्षा भोगलेल्या पतीनं अनैतिक संबंधातून आणखी एका महिलेसोबत केलं असं की … , पोलिसांनी केली अटक

Non Stop LIVE Update
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.