AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suvarna Waje Murder : नाशिकमधील डॉ. सुवर्णा वाजे मृत्यूप्रकरणी धक्कादायक खुलासा, कौटुंबिक वादातून पतीनेच केली हत्या

डॉ. सुवर्णा वाजे यांच्या हत्येप्रकरणी पतीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. 26 जानेवारीला मुंबई-नाशिक महामार्गावर वाडीव-हे परिसरात जळालेल्या कारमध्ये जळालेल्या अवस्थेत सुवर्णा वाजेंचा मृतदेह आढळला होता.

Suvarna Waje Murder : नाशिकमधील डॉ. सुवर्णा वाजे मृत्यूप्रकरणी धक्कादायक खुलासा, कौटुंबिक वादातून पतीनेच केली हत्या
नाशिकमधील डॉ. सुवर्णा वाजे मृत्यूप्रकरणी धक्कादायक खुलासा, कौटुंबिक वादातून पतीनेच केली हत्या
| Edited By: | Updated on: Feb 03, 2022 | 6:24 PM
Share

नाशिक : नाशिकमधील डॉ. सुवर्णा वाजे(Suvarna Waje) हत्या प्रकरणाचे गूढ उकलण्यास अखेर नाशिक पोलिसांना यश आले आहे. सुवर्णा वाजे यांची हत्या पती संदीप वाजेने(Sandeep Waje)च केल्याचे निष्पन्न झाले आहे. कौटुंबिक वादातून पतीने सुवर्णा यांची हत्या केल्याची माहिती मिळते. डॉ. सुवर्णा वाजे यांच्या हत्येप्रकरणी पतीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर वाडीव-हे परिसरात 26 जानेवारी रोजी जळालेल्या कारमध्ये जळालेल्या अवस्थेत सुवर्णा वाजेंचा मृतदेह आढळला होता. त्याच्या एक दिवस आधी वाजे यांच्या पतीने मिसिंगची पोलिसांत तक्रार दिली होती. वाजे या महापालिकेच्या आरोग्य विभागातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत होत्या. (Dr. Suvarna Waje from Nashik was killed by her husband in a family dispute)

वाजे यांची जळालेल्या अवस्थेतील कार सापडल्यानंतर नेमकी ही दुर्घटना आहे की घातपात त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र डिएनए चाचणीनंतर वाजे यांचा घातपात झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी सूत्र हलवत मारेकऱ्याचा शोध सुरु केला असता सुवर्णा यांचे पती संदिप वाजेंनीच त्यांची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सुवर्णा वाजे रुग्णालयातून घरी जाण्यासाठी निघाल्या मात्र पोहचल्याच नाही

मयत डॉ. सुवर्णा वाजे या महापालिकेच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. मंगळवारी 25 जानेवारी रोजीही त्या नोहमीप्रमाणे रुग्णालयात आपली ड्युटी बजावली. त्यानंतर त्या घरी जाण्यास निघाल्या. मात्र घरी पोहचल्याच नाही. सुवर्णा यांचा कुठेच पत्ता लागत नव्हता म्हणून पती संदिप वाजेने स्थानिक पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. यानंतर दुसऱ्या दिवशी नाशिक-मुंबई महामार्गावर मिल्ट्री गेटसमोर त्यांची गाडी जळालेल्या अवस्थेत सापडली. या गाडीत जळालेली हाडे सापडली होती. ही हाडे सुवर्णा वाजेंचीच असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूचे गूढ वाढले होते.

याप्रकरणी पोलिसांनी तपासाला गती देत वाजे यांच्या बहिणीसह रुग्णालयातील सहकाऱ्यांचे जबाब नोंदवले. माहेरच्या लोकांकडून तसेच पतीकडून माहिती घेण्यात आली. मात्र कुणालाच काहीच माहित नव्हते. पोलिसांनी शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरेही तपासले. अखेर या हत्येचे गूढ उकलण्यास पोलिसांना यश आले. कौटुंबिक वादातून पतीनेच सुवर्णा वाजे यांची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. मात्र सुवर्णा वाजे आणि त्यांच्या पतीमध्ये नेमका काय वाद होता आणि त्यांच्या पतीने कसा त्यांचा काटा काढला, याबाबत अद्याप कळू शकले नाही. पोलीस याबाबत सखोल चौकशी करीत आहेत. (Dr. Suvarna Waje from Nashik was killed by her husband in a family dispute)

इतर बातम्या

दरोड्याच्या उद्देशाने घरावर आठ ते दहा जणांचा हल्ला; फायरिंगही केली, घटना सीसीटीव्हीत कैद

Pimpri Chinchwad crime| थेरगाव क्वीनबरोबर धमकीचे व्हिडीओ काढणाऱ्या कुणाल कांबळेच्या  पोलिसांनी मुसक्या आवळल्या

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.