Rajan Salvi News : राजन आता… उद्धव ठाकरे यांचा दोनदा फोन, फक्त दोन वाक्यांमुळे हजारो हत्तींचं बळ

| Updated on: Jan 18, 2024 | 7:31 PM

मी अंब्याचा व्यवसाय करत होतो. 2009पासून मी गेली 14 वर्ष आमदार आहे. या कालावधीत व्यवसायानिमित्ताने मला चांगले पैसे मिळत होते. मी शासनाचे करही भरले आहेत. तीन कोटींपेक्षा जास्त संपत्ती माझ्याकडे आहे, हा आरोप चुकीचा आहे. राजन साळवी काय आहे हे माझ्या कुटुंबाला, जिल्ह्याला आणि मतदारांना माहीत आहे. आतापर्यंत माझ्या सहा चौकश्या झाल्या. माझ्याकडे काहीच सापडलं नाही. पण त्यांना माझ्यावर गुन्हा दाखल करायचाच होता. त्यामुळे त्यांनी केला, असा दावा राजन साळवी यांनी केला.

Rajan Salvi News : राजन आता... उद्धव ठाकरे यांचा दोनदा फोन, फक्त दोन वाक्यांमुळे हजारो हत्तींचं बळ
rajan salvi
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मनोज लेले, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, रत्नागिरी | 18 जानेवारी 2024 : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या घरावर एसीबीने टाकलेली धाड अजूनही थांबलेली नाही. एसीबीचे अधिकारी अजूनही साळवी यांच्या घरात ठाण मांडून आहेत. विविध कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. शेकडो शिवसैनिकांनी सकाळीच राजन साळवी यांच्या घराबाहेर धाव घेतली आहे. तर, दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्यांकडून राजन साळवी यांना फोन करून विचारणा केली आहे. माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही राजन साळवी यांना फोन करून धीर दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी दोनदा फोन करून धीर दिल्याचं साळवी यांनीच म्हटलं आहे.

आमदार राजन साळवी यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे. माझ्या घरी सकाळी एसीबीची धाड पडली. तेव्हापासून दिवसभरात मला उद्धव ठाकरे यांचा मला दोनदा फोन आला. त्यांनी माझं बळ वाढवलं. राजन घाबरायचं नाही, रडायचं नाही, आता लढायचं. शिवसेना तुमच्या पाठी आहे. घाबरू नका, असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या या आधाराच्या शब्दांनी मला बळ मिळालं. संजय राऊत, विनायक राऊत यांच्यासह आमच्या सर्व आमदार आणि नेत्यांचेही मला फोन आले. त्यांनीही माझं मनोबल वाढवलं, असं राजन साळवी म्हणाले.

माझी निष्ठा शिवसेनेशी

माझ्या संपर्कात कोणी नाही. मला शिंदे गटातून कुणाचा फोन नाही. मला कुणाचं प्रलोभन नाही. पण त्यांची इच्छा असेल मी यावं म्हणून. पण मला जायचं नाही. मी बाळासाहेबांचा कडवा निष्ठावंत सैनिक म्हणून जन्माला आलोय, उदयाला आलो. माझा राजकीय बाप बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यांच्याशी गद्दारी करणार नाही. मी एकवेळ तुरुंगात जाईल, पण मी ठाकरेंच्या चरणाशी असल्याने माझी निष्ठा मरेपर्यंत शिवसेनेशीच असेल, असं साळवी यांनी स्पष्ट केलं.

कृपा करून माझ्या पत्नी आणि मुलाावर…

मी चौकशीला सामोरे जाईल. मी इथेच उभा आहे. त्यांनी खुशाल मला अटक करावी. मला अटक करा, तुरुंगात टाका, माझी तयारी आहे. पण माझ्या पत्नीला आणि मुलावर गुन्हा दाखल केला ही चुकीची गोष्ट आहे. कृपा करून असं करू नका. माझ्या पत्नी आणि मुलाविरोधात गुन्हा दाखल केल्याच्या विरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत. जाब विचारणार आहोत. लोकप्रतिनिधीच्या पत्नी आणि मुलावर गुन्हा दाखल करण्याची घटना महाराष्ट्रात घडली. अशी घटना यापूर्वी कुठेच घडली नसेल, असंही ते म्हणाले.

ही तर विजयाची नांदी

खोके सापडले का? माझ्या जुन्या घरी सकाळपासून चौकशी सुरू आहे. माझ्या घरात खोके सापडले असेल, सोनं नाणं सापडलं असेल तर मी चौकशीला सामोरे जायला तयार आहे. माझ्या घरात हे सापडूच शकत नाही. सापडलं असेल तर ते तुमच्यासमोर मांडतील. या षडयंत्रामागे सरकार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि सरकारने माझ्याविरोधात कारवाई करायची हे ठरवलं आहे.

उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या आमदारांवर कारवाई करणार आहेत हे ठरलं आहेत. म्हणूनच रवींद्र वायकर, वैभव नाईक, सुरज चव्हाण आणि माझ्यावर कारवाई झाली. पण आम्ही भीक घालत नाही, असं सांगतानाच आमच्यावर कारवाई होते ही विजयाची नांदी आहे. 2024 वर्ष हे निवडणूक वर्ष आहे. मार्च-एप्रिलमध्ये लोकसभा त्यानंतर विधानसभा येईल. लोक यांना मातीत गाडतील, असंही ते म्हणाले.