VIDEO : आमदार विरुद्ध खासदार, राणा दाम्पत्य मैदानात, गाडी थांबवून Volleyball मॅच

| Updated on: Mar 29, 2021 | 6:20 PM

राणा दाम्पत्य वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. राणा दाम्पत्य तरुणांसोबत उत्स्फूर्तपणे व्हॉलीबॉल खेळत आहे. (navneet rana ravi rana video)

VIDEO : आमदार विरुद्ध खासदार, राणा दाम्पत्य मैदानात, गाडी थांबवून Volleyball मॅच
नवनीत राणा आणि रवी राणा व्हॉलीबॉल खेळताना
Follow us on

अमरावती : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा ( Ravi Rana) हे दाम्पत्य कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत राहते. आपल्या पत्नीसोबत बुलेटवर फेरफटका मारतानाचा रवी राणांची व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो. तर कधी नवनीत राणा महिलांसोबत गरबा खेळतानाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर पसरतो. यावेळी सुद्धा राणा दाम्पत्य आणखी एका कारणामुळे चर्चेत आले आहे. राणा दाम्पत्य तरुणांसोबत उत्स्फूर्तपणे व्हॉलीबॉल खेळत आहे. (Navneet Rana and Ravi Rana playing Volleyball with the youngsters video goes viral)

राणा कुटुंबीय दोन दिवसांपासून मेळघाटात मुक्कामी  

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात होळी तसेच धुळवड मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दाम्पत्यसुद्धा या सणाचा आनंद लुटत आहेत. होळी साजरी करण्यासाठी राणा दाम्पत्य कालपासून मेळघाटात मुक्कामी आहेत. यावेळी नवनीत राणा आणि रवी राणा मेळघाटातील नागरिकांसोबत वेगवेगळ्या पद्धतीने संवाद साधत आहेत.

… आणि राणा दाम्पत्य चक्क मैदानावर

मेळघाटात काही आदिवासी युवक व्हॉलीबॉल खेळत होते. यावेळी राणा दाम्पत्याने आपल्या गाडीचा ताफा रस्त्यावर अचानपकणे थांबवला. नवनीत राणा आणि रवी राणा हे या व्हॉलीबॉल खेळणाऱ्या युवकांकडे आले. त्यानंतर नवनीत राणा आणि रवी राणा या दोघांनीही थेट मैदानवर उतरत युवकांसोबत व्हॉलीबॉल खेळला. कालसुद्धा (28 मार्च) रवी राणा यांनी युवकांसोबत क्रिकेट तसेच रात्री खासदार नवनीत राणा यांनी आदिवासी महिलांसोबत आदिवासी नृत्य केलं होतं.

राणा दाम्पत्याने अशा प्रकारे युवकांसोबत व्हॉलीबॉलचा आनंद लुटला, पाहा व्हिडीओ 

 

दरम्यान, राणा दाम्पत्य यापूर्वीसुद्धा अनेकवेळा सार्वजिनक उपक्रम आणि इतर उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी होताना दिसून आले आहेत. त्यानंतर आता राणा दाम्पत्य व्हॉलीबॉल खेळताना दिसून आले असून त्यांच्या या व्हिडीओला चांगलीच पसंती मिळत आहे.

इतर बातम्या :

VIDEO | मेळघाटात खासदार नवनीत राणा यांचा कोरकू नृत्यावर ठेका