Solapur | सोलापुरातील आजोबांनी 92व्या वर्षी मिळवली पीएच. डी.

| Updated on: Feb 17, 2022 | 4:15 PM

जगात ध्येयवेडी माणसं काहीही करू शकतात, यायाच प्रत्यय सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील सोनंद गावातील लालासाहेब बाबर (Lalasaheb Babar) यांच्याबाबतीत आला आहे. मेहनत, चिकाटीच्या बळावर त्यांनी वयाच्या 92व्या वर्षी पीएचडी (PhD) मिळवली आहे.

Follow us on
जगात ध्येयवेडी माणसं काहीही करू शकतात, यायाच प्रत्यय सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील सोनंद गावातील लालासाहेब बाबर (Lalasaheb Babar) यांच्याबाबतीत आला आहे. जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर लालासाहेब बाबर यांनी वयाच्या 92व्या वर्षी पीएचडी (PhD) मिळवून आपली ध्येयपूर्ती केली आहे. वयाच्या 92व्या वर्षी पीएचडी मिळवणारे लालासाहेब बाबर हे ग्रामीण भागातील एकमेव ठरले आहेत. सोनंद गावचे माजी सरपंच व  गांधीवादी विचारांचे लालासाहेब बाबर यांना कॉमनवेल्थ व्होकेशनल विद्यापीठाने पीएचडी पदवी प्रदान केली आहे. त्यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळातला आहे. ब्रिटीशांनी केलेला अन्याय आणि अत्याचार त्यांनी जवळून पाहिला आहे. तत्कालीन थोर देशभक्त क्रांतिकारक यांच्यापासून  त्यांनी प्रेरणा घेतली आणि ब्रिटिशांच्या विरोधात लढाही दिला होता. 1952 साली  लालासाहेब बाबर यांना शिक्षकाची नोकरी मिळाली. याच दरम्यान त्यांनी  विद्यार्थ्यांमध्ये समाजात  होणारा अन्याय, अत्याचार, अनिष्ठ प्रथा आणि परंपरा या विरोधात लढण्याचे बळ ही दिले. आजही लालासाहेब 92 वर्षांचे असताना ही त्यांचा उत्साह व त्यांची स्मरणशक्ती  ही विलक्षण कौतुकास्पद आहे. शिवाय आजही ते सायकवरून प्रवास करतात. त्यांची ही जिद्द, मेहनत तरुणांना लाजवेल अशीच आहे.