Breaking News : पालघरच्या झाई आश्रम शाळेतील तब्बल 7 विद्यार्थ्यांना स्वाईन फ्लूची लागण, आरोग्य विभागाचे धाबे दणाणले!

| Updated on: Jul 17, 2022 | 1:44 PM

पालघरमधील झाई आश्रम शाळेत सात विद्यार्थ्यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. झाई आश्रम शाळेतील एका सात वर्षीय विद्यार्थ्याला झीकाची लागण झाल्याचे स्पष्ट झालं होतं.

Breaking News : पालघरच्या झाई आश्रम शाळेतील तब्बल 7 विद्यार्थ्यांना स्वाईन फ्लूची लागण, आरोग्य विभागाचे धाबे दणाणले!
Follow us on

पालघर : पालघरमधून एक धक्कादायक (Shocking) बातमी पुढे येतयं. झाई आश्रम शाळेत सात विद्यार्थ्यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे आता आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहेत. आश्रम शाळेतील या मुलांना स्वाईन फ्लूची (Swine flu) लागण नेमकी कशाने झाली याचा शोध आता सुरू असून विद्यार्थ्यांना रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. तसेच या सातही विद्यार्थ्यांनी तब्येत स्थिर असून यांच्यावर पुढील उपचार (Treatment) सुरू आहेत.

आश्रम शाळेतील 7 विद्यार्थ्यांना स्वाईन फ्लूची लागण

झाई आश्रम शाळेतील एका सात वर्षीय विद्यार्थ्याला झीकाची लागण झाल्याचे स्पष्ट झालं होतं. त्यानंतर गव्हर्मेंट इंडियन मिनिस्टर ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअरच्या डेव्हलपमेंट ऑफ सेंट्रल मल्टी डिसिप्लिनरी टीमने या आश्रम शाळेत विद्यार्थ्यांची तपासणी केली असता ही धक्कादायक माहिती पुढे आली. आता खबरदारी म्हणून आश्रम शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आलीयं.

एका सात वर्षीय विद्यार्थ्याला झीकाची लागण

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ होतयं. त्यामुळेही आता पावसाळा सुरू झाल्याने डेंग्यू, मलेरिया अशा साथीच्या आजारांनी डोकेवर काढलेले असतानाच आता पालघरमध्ये आश्रम शाळेतील सात विद्यार्थ्यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याने आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहेत.  त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली.