माझा आवाज वाढला म्हणून तुमच्या गाडीचा स्पीड वाढला, नितेश राणे अधिकाऱ्याला नेमकं काय म्हणाले

| Updated on: Nov 03, 2022 | 4:27 PM

नितेश राणे यांनी गगनबावडा घाटाच्या दुरुवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच झापलं.

माझा आवाज वाढला म्हणून तुमच्या गाडीचा स्पीड वाढला, नितेश राणे अधिकाऱ्याला नेमकं काय म्हणाले
नितेश राणे अधिकाऱ्याला नेमकं काय म्हणाले
Image Credit source: tv 9
Follow us on

सिंधुदुर्ग : पश्चिम महाराष्ट्राला कोकणाला जोडणाऱ्या गगनबावडा घाटाच्या दुरावस्थेची पाहणी आमदार नितेश राणे यांनी केली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. अधिकारी व ठेकेदारांच्या कार्यपद्धतीबाबत आपण वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी घाटरस्ता सुरळीत होत नाही तोपर्यंत हा विषय लावून धरणार असल्याचे सांगितले.

नितेश राणे यांनी गगनबावडा घाटाच्या दुरुवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच झापलं. कोल्हापूरवरून सकाळी गेलो. आतापर्यंत खड्डे आता तरी बघा. सांगूच नका हो जाधवजी. मी ओरडल्याशिवाय तुम्ही येथे यायला तयार नव्हते. माझा आवाज वाढला म्हणून तुमच्या गाडीची स्पीड वाढली. मला येण्यासाठी साडेतीन तास लागले.

गगनबावडा घाटाची दुरावस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. यामुळं प्रवाशांना प्रचंड त्रास होत आहे. नितेश राणे यांनी या रस्त्यानं प्रवास केली. यावेळी त्यांना साडेतीन तास लागले. त्यामुळं ते चांगलेच संतापले. अधिकारी रस्ता दुरुस्त का करत नाही, असा त्यांचा सवाल होता.