प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याच्या सूचना, लातूरमध्ये लवकरच निवडणुकीचे बिगूल वाजणार ?

| Updated on: Aug 21, 2021 | 6:33 PM

चार नगरपरिषद तसेच चार नगरपंचायतींच्या निवडणुकाल लवकरच होण्याची शक्यता. त्याची पूर्वतयारी म्हणून निवडणूक आयोगाने येथील प्रशासनाला प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सूचनेनंतर आता लवकरच निवडणुकीचा आखाडा येत्या काही महिन्यात रंगणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याच्या सूचना, लातूरमध्ये लवकरच निवडणुकीचे बिगूल वाजणार ?
ELECTION
Follow us on

लातूर : कोरोना रुग्णांची संख्या कमी होताच जिल्ह्यात पुन्हा एकदा निवडणुकांचे बिगूल वाजण्याची चिन्हा आहेत. येथे तीन नगरपरिषदा तसेच चार नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून निवडणूक आयोगाने येथील प्रशासनाला प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सूचनेनंतर आता लवकरच निवडणुकीचा आखाडा येत्या काही महिन्यात रंगणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Election Commission instructed latur district collector to prepare rough outline ward structure for nagar panchayat and nagar palika election)

प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याच्या सूचना

लातूर जिल्ह्यातील चार नगरपंचायतींची मुदत संपलेली आहे. तसेच तीन नगरपरिषदांची मुदत येत्या डिसेंबरमध्ये संपणार आहे. उर्वरित एका नगर पालिकेची मुदत पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये संपेल. या सर्व गोष्टीमुळे लातूरमध्ये नंगरपंचायत आणि नगरपालिका यांची निवडणूक घेणे क्रमप्रात्त आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाना प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. हे काम येत्या 23 ऑगस्टपासून सुरु केले जाणार आहे. त्यामुळे लवकरच नगर पंचायतींच्या निवडणुका होऊ शकतात अशी स्थिती आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुका 31 ऑगस्टनंतर तातडीने घ्या

दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे वेगवेगळ्या निवडणुका घेण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. राज्यातील जिल्हा बँकांचीदेखील निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश सहकार विभागानं 9 ऑगस्ट रोजी दिले आहेत. कोरोनामुळे अनेक जिल्हा बँकांच्या निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत. काही जिल्हा बँकांच्या संचालक मंडळाची मुदत संपून 15 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी संपला आहे. सहकार विभागानं कोरोनामुळे 31 ऑगस्टपर्यंत राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या आहेत. मात्र, जिल्हा बँकेच्या निवडणुका 31 ऑगस्टनंतर तातडीने घेण्यात याव्या यासाठी आतापासूनच प्रारुप मतदार याद्या तयार करा असे सांगण्यात आले आहे.

इतर बातम्या :

‘मदिरालयावर ज्यांचा विश्वास, त्यांना मंदिरांशी काही देणंघेणं नाही’, सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला टोला

शिवछत्रपती पुरस्कार, 8 गोल्ड मेडल, तरीही करावं लागतंय पेट्रोल पंपावर काम, प्रवीण वाहलेंच्या व्यथा सरकार जाणून घेणार ?

‘परमबीर सिंग, सचिन वाझे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 9 लाख वसूल केले’, बारमालकाचा खळबळजनक आरोप

(Election Commission instructed latur district collector to prepare rough outline ward structure for nagar panchayat and nagar palika election)