‘परमबीर सिंग, सचिन वाझे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 9 लाख वसूल केले’, बारमालकाचा खळबळजनक आरोप

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'परमबीर सिंग, सचिन वाझे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 9 लाख वसूल केले', बारमालकाचा खळबळजनक आरोप
अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरून आपलं निलंबन रद्द करण्यासाठी अर्ज केला
Follow us
| Updated on: Aug 21, 2021 | 5:07 PM

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात परमबीर सिंग यांच्यासह सचिन वाझे, सुमित सिंह, अल्पेश पटेल, विनय सिंह, रियाज पाटील अशी देखील नावं आहेत. विमल अग्रवाल नावाच्या एका व्यापाऱ्याने पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अग्रवाल यांनी तक्रारीत परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

बारमालकाने तक्रारीत नेमकं काय म्हटलंय?

“माझं पार्टनरशिपमध्ये गोरेगाव इथे BOHO रेस्टॉरंट आणि बार आहे. अंधेरीमध्ये BCB स्टोअर आणि बार आहे. हे दोन्ही चालू ठेवण्यासाठी सचिन वाझे आणि अन्य आरोपींनी 9 लाख रुपये घेतले होते. आरोपींनी जानेवारी- फेब्रुवारी 2020 पासून ते मार्च 2021 या काळात 9 लाखांची वसूली केली आहे”, असा आरोप अग्रवाल यांनी तक्रारीत केला आहे.

एका आरोपीला बेड्या

मुंबई पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहिता नुसार 384 ,385 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी याप्रकरणी सुमित सिंह याला अटक केली आहे. बोरीवली कोर्टाने आरोपीला 23 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत पाठवलं आहे.

परमबीर सिंग यांच्यावर ठाण्यातही गुन्हा दाखल

परमबीर सिंग यांच्यावर याआधी ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद अग्रवाल नावाच्या व्यक्तीने परमबीर सिंग यांनी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप केला होता. ठाणे शहरातील कोपरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात होता. परमबीर सिंह यांच्यासोबत संजय पुनामिया, सुनील जैन, मनोज घोटकर आणि डीसीपी पराग मणेरे असे सहआरोपी आहेत. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक फूलपगारे करत आहेत.

खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा

याआधी, परमबीर सिंह, डीसीपी अकबर पठाण (DCP Akbar Pathan) यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. बिल्डर श्याम सुंदर अगरवाल यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. केस मागे घेण्यासाठी आपल्याकडे खंडणी मागितल्याचा दावा श्याम सुंदर अगरवाल यांनी केला होता. त्यानंतर परमबीर सिंग यांच्यासह सहा जणांवर खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. संजय पुनमिया आणि सुनील जैन यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे दोघे परमबीर यांच्यासाठी खंडणी उकळायचे, असा आरोप आहे.

परमबीर सिंग आणि अनिल देशमुख प्रकरण

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिमहिना 100 कोटींची वसुली करण्याचे आदेश दिल्याचा आरोप करणारे पत्र मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिले होते. देशमुख किंवा त्यांच्या कार्यालयातील कोणत्याही अधिकाऱ्याकडून कोणतेही गैरवर्तन किंवा गुन्हा झाल्याबाबत ही समिती चौकशी करणार आहे.

हेही वाचा : 

मूल होत नाही म्हणून मित्राच्या मुलाचं अपहरण, नंतर निर्घृण हत्या, मृतदेह शेतात पुरला, कोल्हापूरच्या ‘त्या’ सात वर्षीय चिमुकल्याची चूक काय?

वर्दीला डाग, पोलीस हवालदाराकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, जिथे कार्यरत, त्याच पोलीस ठाण्यात बेड्या

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.