वर्दीला डाग, पोलीस हवालदाराकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, जिथे कार्यरत, त्याच पोलीस ठाण्यात बेड्या

डोंबिवलीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलीस कर्मचाऱ्यानेच अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

वर्दीला डाग, पोलीस हवालदाराकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, जिथे कार्यरत, त्याच पोलीस ठाण्यात बेड्या
डोंबिवली पोलीस

मुंबई : डोंबिवलीत (Dombivli ) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलीस कर्मचाऱ्यानेच अल्पवयीन मुलीचा विनयभंग (miner girl molestation) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीला पोलिसांनी कल्याण कोर्टात हजर केलं. त्यावेळी कोर्टाने त्याची रवानगी जेलमध्ये केली. या प्रकारानंतर कल्याण पोलीस उपायुक्तांनी आरोपी पोलिसावरप निलंबनाची कारवाई केली.

नेमका प्रकार काय?

पोलिस कर्मचाऱ्याकडून एका अल्पवयीन तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली. रामनगर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेला आरोपी पोलीस हवालदार सध्या जेलमध्ये आहे. त्याच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्या पोलीस स्टेशनमध्ये आरोपी पोलीस कार्यरत होता त्याच पोलीस स्टेशनमध्ये त्याला अटक झाली आहे.

छेडछाडीचा आरोप

डोंबिवलीत राहणाऱ्या एका अल्पवयीन तरुणीने तिच्या इमारतीत राहणाऱ्या एका पोलिस कर्मचाऱ्याच्या विरोधात छेडछाड केल्याचा आरोप लावला. त्या तरुणीने ही सगळी बाब तिच्या कुटुंबियांना सांगितली. तरुणीचा आरोप आहे की पोलिस कर्मचाऱ्याने जिना चढताना तिच्यासोबत गैरवर्तन केले. या प्रकरणी डोंबिवलीच्या रामनगर पोलिसांनी 354 कलमांतर्गत गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली.

आरोपी पोलीस हा रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होता. याबाबत रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सचिन सांडभोर यांनी सांगितले की, तक्रार आल्यावर आम्ही त्याला अटक करुन, त्याला न्यायालयासमोर हजर केले. न्यायालायने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान, कल्याण पोलीस उपायुक्तांनी आरोपी पोलिसाविरोधात निलंबनाची कारवाई केली आहे. या घटनेमुळे कल्याण डोंबिवलीत एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या 

दुसरं लग्न केलं, मुलगी झाली, पण पत्नीच्या चारित्र्यावर संशय, राक्षसी पतीने जे केलं ते हादरवणारं

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI