Shirdi | शिर्डीमध्ये पावसाचा हाहा:कार सब स्टेशन, शासकीय विश्रामगृह आणि साई प्रसादालयाभोवती पाणीच पाणी…

| Updated on: Aug 08, 2022 | 12:28 PM

रात्रीपासून शिर्डीतील अनेक भागाचा वीजपुरवठा खंडीत आहे. साई प्रसादालयात जाताना भाविकांची तारांबळ उडालीयं. गुडघाभर पाण्यातून वाट काढत भाविकांना प्रसादालयात जावे लागतंय.

Shirdi | शिर्डीमध्ये पावसाचा हाहा:कार सब स्टेशन, शासकीय विश्रामगृह आणि साई प्रसादालयाभोवती पाणीच पाणी...
Follow us on

शिर्डी : शिर्डीमध्ये (Shirdi) काल रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावलीयं. रात्री झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण परिसर दणावून गेलायं. शिर्डीचे महावितरणचे सब स्टेशन तसेच शासकीय विश्रामगृहाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. इतके नाही तर साई प्रसादालयाभोवती पाणीच पाणी (Water) झाल्याचे चित्र आहे. गुडघाभर पाण्यातून वाट काढत भाविकांना ये जा करावी लागत आहे. मुसळधार पावसामुळे शिर्डीतील वीज ठप्प आहे. रात्रीपासून शिर्डीतील अनेक भागाचा विजपुरवठा खंडीत करण्यात आल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. पावसामुळे (Rain) अनेक ठिकाणी लाईटचे खांब देखील पडले आहेत.

शिर्डीमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने साई प्रसादालयाच्या परिसरात पाणीच पाणी

राज्यात गेल्या काही दिवसांपासून काही भागांमध्ये सातत्याने मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत असून हजारो घरांमध्ये देखील पाणी शिरल्याने मोठे नुकसान होत आहे. काल संध्याकाळी शिर्डीमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने साई प्रसादालयाच्या परिसरात देखील पाणीच पाणी साचल्याने मोठी तारांबळ उडालीयं. जोरदार पावसामुळे शिर्डीतील वीज पुरवठा देखील खंडीत करण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा

पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र

रात्रीपासून शिर्डीतील अनेक भागाचा वीजपुरवठा खंडीत आहे. साई प्रसादालयात जाताना भाविकांची तारांबळ उडालीयं. गुडघाभर पाण्यातून वाट काढत भाविकांना प्रसादालयात जावे लागतंय. शासकीय विश्रामगृह पाण्याचा विळखा अडकले आहे. परिसरातील पाणी काढण्यासाठी सध्या उपाययोजना सुरू आहेत. मुसळधार पावसाने शेतीही पाण्याखाली गेलीयं तर रस्ते देखील जलमय झाले आहेत. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र बघायला मिळते आहे.