Washim Rain | वाशिमच्या गिंभा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस, गावाला आले नदीचे स्वरूप, प्रशासनाने दिला सर्तकतेचा इशारा

काटा येथुन उगम होणाऱ्या काटेपूर्णा नदीच्या उगमस्थानी सुद्धा मोठा पुर आला आहे. त्यामुळे शेतात जाणारे शेतकरी गावातच अडकून पडले आहेत. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

Washim Rain | वाशिमच्या गिंभा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस, गावाला आले नदीचे स्वरूप, प्रशासनाने दिला सर्तकतेचा इशारा
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 11:43 AM

वाशिम : वाशिम (Washim) जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून संध्याकाळी अनेक ठिकाणी ढगफुटी सदृष्य पाऊस पडत आहे. काल सायंकाळी मंगरूळपीर तालुक्यातील गिंभा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्यामुळे संपूर्ण परिसराला नदीचे स्वरूप आले होते. या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान देखील झालंय. वाशिम जिल्ह्यात 8 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस (Rain) कोसळत असून या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. मात्र, या पावसामुळे नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे चित्र असून हजारो लोकांच्या घरामध्ये पावसाचे पाणी (Water) शिरले आहे.

सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश नद्यांना पूर

सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश नद्यांना पुर आला असून गाव परिसरातील नाल्यांनाही पुर आलायं. त्यामुळे गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाशिम तालुक्यातील सोनखास येथील खुल्या मैदानात पाणी साचले आहे तर उमरा मोठा ते पार्डी आसरा दरम्यान असलेल्या नाल्याला पुर येऊन वाशिमकडे येणारे वाहनधारक पुरामुळे अडकून आहेत. काटा येथुन उगम होणाऱ्या काटेपूर्णा नदीच्या उगमस्थानी सुद्धा मोठा पुर आला आहे. त्यामुळे शेतात जाणारे शेतकरी गावातच अडकून पडले आहेत. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

हे सुद्धा वाचा

मोठा उमरा, वारा जहांगीर या गावाचा संपर्क तुटला

काल रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आला आहे. जिल्ह्यात कारंजा तालुक्यातील अडाण, मालेगाव तालुक्यातील सोनल व वाशिम तालुक्यातील एकबुर्जी हे मोठे प्रकल्प आधीच ओसंडून वाहत होते. आता अनेक छोटे प्रकल्पही शंभर टक्के भरले असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. वाशिम तालुक्यातील पारडी आसरा गावाजवळील पुलावरून पाणी वाहत असल्याने व दुसऱ्या बाजूने पूस नदीलाही पूर आल्याने मोठाउमरा, वारा जहांगीर या गावाचा संपर्क तुटला आहे.

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.