AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॉन्स्टेबल पतीने IAS अधिकाऱ्यास सॅल्यूट ठोकले, त्याच वेळी दोन मुलांच्या आईने IAS बनण्याचा केला निर्धार

ips exam success story: अंबिका आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. यामुळे परिवार त्यांचा सोबत आला. मग दहावीनंतरचे शिक्षण पूर्ण केले. बारावीनंतर पदवी मिळवली. पदवी घेतानाच यूपीएससीची तयारी सुरु केली.

कॉन्स्टेबल पतीने IAS अधिकाऱ्यास सॅल्यूट ठोकले, त्याच वेळी दोन मुलांच्या आईने IAS बनण्याचा केला निर्धार
एन. अंबिका
Updated on: Apr 27, 2024 | 9:26 AM
Share

आयपीएस एन. अंबिका. तामिळनाडू. संघ लोकसेवा आयोगापर्यंत एन. अंबिका यांची वाटचाल प्रेरणादाई आहे. प्रयत्न केल्यास काही अशक्य नाही, हे दाखवणारी त्यांची यशोगाथा आहे. वयाच्या 14 व्या वर्षी त्यांचे लग्न झाले.  वयाच्या 18 वर्षी त्यांना दोन मुले झालीत. घरात सर्व सुखसोयी होत्या. त्यांच्या संसारात एन. अंबिका रमल्या होत्या. परंतु असे काही झाले की त्यांनी आयपीएस बनवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांचे शिक्षण फक्त दहावीपर्यंत झाले होते. पतीला हा निर्णय सांगितल्यावर त्यांनी सुरुवातीला हसण्यावरती नेले. परंतु अंबिका आपल्या निर्णयावर ठाम होत्या.

का घेतला IPS बनवण्याचा निर्णय

एन. अंबिका यांचे पती तामिळनाडू पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. प्रजाकसत्ताक दिनाच्या परेडमध्ये आयपीएस अधिकाऱ्यास त्यांच्या पतीने सॅल्यूट ठोकले. ते अंबिका यांनी पाहिले. त्यावेळी आयपीएस अधिकाऱ्यास एक वेगळाच सन्मान असल्याचे त्यांनी पाहिले. ही गोष्टी त्यांच्या मनात खोल रुजली. मग आपणही आयपीएस अधिकारी बनावे, असा निर्णय त्यांनी घेतला. त्यांच्या या निर्णयास घरी कोणी गंभीरतेने घेतले नाही. कारण त्यांचे शिक्षण फक्त दहावी झाले होते. परंतु एन. अंबिका यांनी करुन दाखवले. त्या आयपीएस झाल्या.

यूपीएससीची तयारी झाली सुरु

अंबिका आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. यामुळे त्यांचा परिवार त्यांचा निर्णयाचा सोबत आला. मग दहावीनंतरचे शिक्षण पूर्ण केले. बारावी केल्यानंतर पदवी मिळवली. पदवी घेतानाच यूपीएससीची तयारी सुरु केली. त्यासाठी पती अन् मुलांसोबत त्या चेन्नईमध्ये शिफ्ट झाल्या होत्या. त्यांचे पती आपले ड्यूटी सांभाळून मुलांची देखभाल करत होते.

असे मिळवले यश

अंबिका यांनी परीक्षेची तयारी केली अन यूपीएससीची परीक्षा दिली. पहिल्या प्रयत्नात त्यांना यश आले नाही. दुसऱ्या, तिसऱ्या प्रयत्नातही अपयश मिळाले. त्यानंतर त्यांच्या पतीचा विश्वास तुटला. त्यांनी पुन्हा घरी जाण्याचा विचार सुरु केला. परंतु अंबिका पराभव पत्कारला तयार नव्हत्या. पुन्हा एकदा त्यांनी परीक्षेची तयारी सुरु केली. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. 2008 मध्ये अंबिका आयपीएस झाल्या. प्रयत्न केल्यास काहीच अशक्य नाही, हे त्यांनी दाखवून दिले.

अजित पवार आणि धनंजय मुंडेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवर वाल्मिक कराडचा फोटो
अजित पवार आणि धनंजय मुंडेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवर वाल्मिक कराडचा फोटो.
पक्षाचं नाव कोणत्याही येड्या गबाळ्याला द्यायचं हे.., - उद्धव ठाकरे
पक्षाचं नाव कोणत्याही येड्या गबाळ्याला द्यायचं हे.., - उद्धव ठाकरे.
महाराष्ट्रात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा येणार
महाराष्ट्रात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा येणार.
आरोपीला व्हीआयपी ट्रि्टमेंट मिळतेय; प्रवीण गायकवाड यांचा गंभीर आरोप
आरोपीला व्हीआयपी ट्रि्टमेंट मिळतेय; प्रवीण गायकवाड यांचा गंभीर आरोप.
चड्डी-बनियानने अधिवेशन गाजवलं! आदित्य ठाकरे-नीलेश राणेंमध्ये जुंपली
चड्डी-बनियानने अधिवेशन गाजवलं! आदित्य ठाकरे-नीलेश राणेंमध्ये जुंपली.
पैशांची खूप मस्ती आली का? तुला..; भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल
पैशांची खूप मस्ती आली का? तुला..; भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल.
चड्डी, बनियन गँग उघडी-नागडी फिरतेय, त्यांना..; अनिल परबांची टीका
चड्डी, बनियन गँग उघडी-नागडी फिरतेय, त्यांना..; अनिल परबांची टीका.
परमीट रुम्स, बार बंद, ड्राय डेमुळे तळीरामांचा वांधा
परमीट रुम्स, बार बंद, ड्राय डेमुळे तळीरामांचा वांधा.
जयंत पाटलांनी राजीनामा दिला नाही? सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा
जयंत पाटलांनी राजीनामा दिला नाही? सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा.
सुप्रीम कोर्टाकडून उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा
सुप्रीम कोर्टाकडून उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा.