लाखोंची नोकरी सोडून UPSC ची तयारी, टॉपर आदित्य श्रीवास्तव याचा यशाचा फंडा काय?

UPSC 2023 Topper Aditya Srivastava: आदित्याची गेल्या वर्षी आयपीएससाठी निवड झाली. तो सध्या आयपीएसचे प्रशिक्षण घेत आहे. गेल्या वर्षी दुसऱ्याच प्रयत्नात तो पात्र ठरला होता. त्याला २२६ रँक मिळाली होती. तिसऱ्या प्रयत्नात पहिली रँक आली.

लाखोंची नोकरी सोडून UPSC ची तयारी, टॉपर आदित्य श्रीवास्तव याचा यशाचा फंडा काय?
UPSC 2023 Topper Aditya Srivastava
Follow us
| Updated on: Apr 17, 2024 | 7:41 AM

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (युपीएससीचा) निकाल जाहीर झाला आला. या निकालामध्ये महाराष्ट्राने डंका वाजवला. राज्यातून ८७ पेक्षा जास्त जणांना यश मिळाले. देशातून आदित्य श्रीवास्तव याने टॉप केले आहे. कानपूरमधून आयआयटी झालेला आदित्य कॉर्पोरेट क्षेत्रात रुजू झाला. १५ महिने काम केले. परंतु त्याचे मन कॉर्पोरेट क्षेत्रात रमले नाही. त्याला यूपीएससी परीक्षेचे क्षेत्र खुणावत होते. मग त्याने कॉर्पोरेट क्षेत्राला रामराम करत यूपीएससीची तयारी करण्याचा निर्णय घेतला.

लहाणपणापासून टॉपर

आदित्य लहाणपणापासून टॉपर रहिला होता. त्याचे प्राथमिक शिक्षण लखनऊमधील सीएमएस शाळेत झाले. या शाळेत बारावीपर्यंत आदित्य टॉपर राहिला. त्याला दहावीत 97.8 तर बारावीत 97.5 परसेंट मिळाले. तसेच जेईई मेन्स परीक्षेत त्याला चांगली रँक मिळाली. त्यानंतर आयआयटी कानपूरमध्ये तो दाखल झाला. या ठिकाणी बीटेकमध्ये 9.7 सीजीपीए मिळवले.

हे सुद्धा वाचा

आदित्य श्रीवास्तव कुटुंबासोबत

अन् लाखोंची नोकरी सोडली

आयआयटीमधून इंजिनिअर झाल्यानंतर आदित्य याने अमेरिकन संस्था गोल्डमन सॅक्समध्ये नोकरी केली. त्या ठिकाणी महिन्याला अडीच लाखांचा पगार त्याला होतो. परंतु त्याचे मन त्या नोकरीत रमले नाही. त्याने यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याने कठोर मेहनत केली. यूपीएससीसाठी ऑप्शनल विषय म्हणून इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग इंजिनिअरिंगची निवड केली. त्याची मेहनत यशस्वी ठरली. २०२३ परीक्षेत तो टॉपर आला.

आई गृहिणी, काका आयएएस प्रशिक्षण केंद्राचे संचालक

आदित्याची गेल्या वर्षी आयपीएससाठी निवड झाली. तो सध्या आयपीएसचे प्रशिक्षण घेत आहे. गेल्या वर्षी दुसऱ्याच प्रयत्नात तो पात्र ठरला होता. त्याला २२६ रँक मिळाली होती. तिसऱ्या प्रयत्नात पहिली रँक आली. आदित्यची आई गृहणी आहे. त्याचे वडील अजय श्रीवास्तव सेंट्रल ऑडिट डिपार्टमेंटमध्ये AAO आहेत. त्याचे काका विनोदकुमार मसुरी आयएएस प्रशिक्षण केंद्राचे संचालक आहे.

फडणवीसांचा मविआला चिमटा, 'साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे..'
फडणवीसांचा मविआला चिमटा, 'साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे..'.
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण.
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?.
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते...
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते....
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण.
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?.
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल.
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्..
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्...
'... त्यांच्या तोंडाला फेस येईल', फडणवीसांच्या टीकेवर राऊतांचा पलटवार
'... त्यांच्या तोंडाला फेस येईल', फडणवीसांच्या टीकेवर राऊतांचा पलटवार.
प्रतापगड 365 मशालींच्या तेजोमय प्रकाशानं उजळला, बघा नेत्रदिपक नजारा
प्रतापगड 365 मशालींच्या तेजोमय प्रकाशानं उजळला, बघा नेत्रदिपक नजारा.