AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्नीला मोबाईलचं वेड लागलं अन् एका नकारामुळे संपूर्ण कुटुंब संपलं; नेमकं काय घडलं?

बीडच्या लिंबारुईमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. मोबाईल फोनच्या शुल्लक कारणावरून आईने आपल्या ४ वर्षांच्या मुलाची हत्या करून स्वतःही आत्महत्या केली. या प्रकरणाच्या पोलीस तपासातील धक्कादायक माहिती सविस्तर वाचा.

पत्नीला मोबाईलचं वेड लागलं अन् एका नकारामुळे संपूर्ण कुटुंब संपलं; नेमकं काय घडलं?
beed crime
| Updated on: Feb 02, 2026 | 1:39 PM
Share

बीड जिल्ह्यामध्ये नात्याला काळिमा फासणारी आणि काळजाचा थरकाप उडवणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीने नवीन मोबाईल फोन घेऊन दिला नाही या एका किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर भीषण दुर्घटनेत झाले. रागाच्या भरात एका मातेने आपल्या अवघ्या चार वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याला विहिरीत ढकलून त्याचा जीव घेतला. यानंतर तिने स्वतःही त्याच विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यातून हळहळ व्यक्त होत आहे. तसेच सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.

बीड तालुक्यातील लिंबारुई येथे ३१ डिसेंबर रोजी घडलेल्या या माय-लेकाच्या मृत्यूच्या प्रकरणाला आता पोलीस तपासात एक भयानक वळण मिळाले आहे. वर्षाच्या शेवटच्या दिवशी विहिरीत दोन मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. मात्र त्यावेळी हे मृत्यू नेमके कशामुळे झाले हे अस्पष्ट होते. अखेर बीड ग्रामीण पोलिसांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषण आणि स्थानिक चौकशीतून हे विदारक सत्य समोर आले आहे. मोबाईलच्या हट्टापायी एका मातेने स्वतःच्याच हसत्या-खेळत्या संसाराची राखरांगोळी केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस प्रशासनही अवाक झाले आहे.

नेमकं काय घडलं?

३१ डिसेंबर २०२५ रोजी वर्षाचा शेवटचा दिवस असताना लिंबारुई शिवारातील एका विहिरीत दोन मृतदेह तरंगताना आढळले होते. प्राजक्ता उर्फ रामेश्वर दराडे आणि तिचा चार वर्षाचा मुलगा अशी मृतांची ओळख पटली होती. सुरुवातीला ही आत्महत्या असावी असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, ग्रामीण पोलिसांनी जेव्हा मृताच्या नातेवाईकांकडे आणि परिसरात चौकशी केली, तेव्हा संशयाची सुई घरगुती वादाकडे वळली.

यावेळी तपासादरम्यान समोर आले की, प्राजक्ता यांना नवीन मोबाईल फोन हवा होता. त्यासाठी त्या पतीकडे वारंवार हट्ट करत होत्या. मात्र आर्थिक परिस्थिती किंवा इतर कारणांमुळे पती मोबाईल घेऊन देण्यास टाळाटाळ करत होता. याच वादातून ३१ डिसेंबरला त्यांच्यात पुन्हा खटका उडाला. यानंतर रागाच्या भरात प्राजक्ता यांनी टोकाचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या निष्पाप मुलाला सोबत घेतले आणि विहीर गाठली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विहिरीवर गेल्यावर प्राजक्ता यांनी आधी चार वर्षांच्या वेदांतला विहिरीच्या पाण्यात ढकलून दिले. मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी स्वतः विहिरीत उडी घेतली. एका मोबाईलच्या हट्टापायी आईनेच मुलाचा काळ बनणे, ही बाब बीडकरांच्या मनाला चटका लावून जाणारी ठरली आहे. याप्रकरणी आता खुनाचा आणि आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Follow Us
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर