AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: पराभव मान्य करून चेंडूवर जोरात मारली लाथ आणि सामना झाला टाय, सुपर ओव्हरमध्ये निकाल

दिल्ली प्रीमियर लीग 2026 स्पर्धेतील आठव्या सामन्यात आश्चर्यकारक प्रकार घडला. सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. न्यू दिल्ली टायगर्सचा कर्णधार हिम्मत सिंहने विचित्र पद्धतीने धावचीत केलं आणि सामन्याचं चित्र बदललं.

Video: पराभव मान्य करून चेंडूवर जोरात मारली लाथ आणि सामना झाला टाय, सुपर ओव्हरमध्ये निकाल
Video: पराभव मान्य करून चेंडूवर जोरात मारली लाथ आणि सामना झाला टाय, सुपर ओव्हरमध्ये निकालImage Credit source: DPL
| Updated on: Aug 04, 2026 | 10:21 PM
Share

क्रिकेटमध्ये खेळ रंगला असताना पारडं कधी बदलेल सांगता येत नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत कधी कधी सामन्याचा निकाल काय लागेल सांगता येत नाही. असे अनेक सामने आजही आपल्या स्मरणात आहेत. असाच एक सामना दिल्ली प्रीमियर लीग 2026 स्पर्धेत झाला. या स्पर्धेच्या आठव्या सामन्यात आश्चर्यकारक निकालाची नोंद झाली. दिल्लीच्या अरूण जेटली मैदानात न्यू दिल्ली टायगर्स आणि आउटर दिल्ली वॉरियर्स संघ आमनेसामने आले होते. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना 15 षटकांचा करण्यात आला होता. न्यू दिल्ली टायगर्सने 15 षटकात 5 विकेट गमवून 156 धावा केल्या. पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार हे टार्गेट दिलं होतं. या धावांचा पाठलाग करताना आउटर दिल्ली वॉरियर्सने 15 षटकात 9 गडी गमवून 155 धावा केल्या आणि सामना टाय झाला. त्यामुळे सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. खरं तर या सामन्यात न्यू दिल्ली टायगर्सचा कर्णधार हिम्मद सिंह याचा राग कामी आला.

शेवटच्या षटकात काय झालं?

14व्या षटकापर्यंत आउटर दिल्ली वॉरियर्सने 7 गडी गमवून 147 धावा केल्या होत्या. त्यामुळे शेवटच्या षटकात 9 धावांची गरज होती. शिवम शर्मा आणि सिद्धांत शर्मा हे दोघं मैदानात होते. शिवम शर्माने 15व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारला. त्यानंतर 1 धाव घेतल सिद्धांतला स्ट्राईक दिली. हा चेंडू नो टाकल्याने अतिरिक्त धाव मिळाली. पुन्हा टाकलेल्या चेंडूवर सिद्धांतने 1 धावा घेतली. शिवमने चौथ्या चेंडूवर पुन्हा 1 धाव घेतली आणि सिद्धांतला स्ट्राईकला पाठवलं. आता 2 चेंडूत 1 धाव हवी होती. पण पाचव्या चेंडूवर सिद्धांत बाद झाला आणि प्रथम सलुजा फलंदाजीला आला. 1 चेंडूत 1 धाव अशी स्थिती होती. स्ट्राईकला असलेल्या प्रथम सलुजाने जोरात प्रहार केला आणि धाव घेतली. मिड-ऑफला क्षेत्ररक्षण करत असलेला कर्णधार हिम्मत सिंह चेंडू पकडताना हुकला आणि रागाच्या भरात त्याने चेंडूवर लाथ मारली. त्याला नशिबाची साथ मिळाली आणि चेंडू नॉन स्ट्रायकर एण्डला असलेल्या यष्टींवर आदळला. त्यामुळे आश्चर्यकारकरित्या धावचीत मिळाला आणि सामना ड्रॉ झाला.

सुपर ओव्हमध्ये आउटर दिल्ली वॉरियर्स विजयी

सुपर ओव्हरमध्ये दिल्ली आउटरच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. दिल्ली वॉरियर्सने 20 धावा केल्या आणि 21 धावांचं आव्हान दिलं. न्यू दिल्ली टायगर्सकडून कर्णधार हिम्मत सिंह मैदानात उतरला होता. त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. पण दुसऱ्या चेंडूवर झेल बाद होत तंबूत परतला. त्यानंतर आलेला शिवम गुप्ता काही खास करू शकला नाही आणि पहिल्याच चेंडूवर विकेट फेकली. खरं तर आउटर दिल्ली वॉरियर्स हातून गेलेला सामना त्यांनी पुन्हा सुपर ओव्हरमध्ये जिंकला.

Follow Us
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर भोजन...
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर स्नेहभोजन अन् बाप्पाचे दर्शन
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह...
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह संध्याकाळी ७ वाजता उपस्थिती
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरे...
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणात नवा ट्वीस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरेंचं नाव नाहीच...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णायक सुनावणी? शिंदेंचे वकील करणार...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णयाक सुनावणी... शिंदेंचे वकिल करणार युक्तिवाद
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण