AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सॉरी एश भाई…’ अर्शदीप सिंगने आर अश्विनची माफी का मागितली?

अर्शदीप सिंह भारतीय संघातील महत्त्वाच्या गोलंदाजापैकी एक आहे. इंग्लंड दौऱ्यात वनडे आणि टी20 संघाचा भाग होता. पण त्यानंतर झालेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या टी20 मालिकेत आराम दिला गेला. आता श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतही त्याला संधी मिळालेली नाही. असं असताना अर्शदीप सिंगवर आर अश्विनची माफी मागण्याची वेळ आहे.

'सॉरी एश भाई...' अर्शदीप सिंगने आर अश्विनची माफी का मागितली?
'सॉरी एश भाई...' अर्शदीप सिंगने आर अश्विनची माफी का मागितली? Image Credit source: PTI
| Updated on: Aug 04, 2026 | 6:05 PM
Share

भारतीय संघातील डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचा बिंधास्त अंदाज क्रिकेटप्रेमींनी अनुभवला आहे. अर्शदीप सिंग कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो. आयपीएल स्पर्धेदरम्यान त्याने अनेक व्हिडीओ आणि रील पोस्ट केले होते. काही रील्सवरून वादही झाला होता, त्यामुळे डिलिट करण्याची वेळ आली होती. इतकंच काय तर बीसीसीआयने काही बंधनं देखील त्यानंतर लादली होती. पण अर्शदीप सिंगने आपला अंदाज काही बदलला नाही. चाहत्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी काही ना काही करत राहिला. आता पुन्हा एकदा अर्शदीप सिंग चर्चेत आला आहे. एका मुलाखतीत भारताचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विनची माफी मागण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. असं काय झालं की आर अश्विनला माफी मागावी लागली? अश्विनबाबत त्याने आपल्या मनातली गोष्ट सांगितली..

आर अश्विनबाबत काय म्हणाला अर्शदीप सिंग?

अर्शदीप सिंगला एका पॉडकास्टवर मुलाखती दरम्यान टॉप 5 गोलंदाजांची नावं जाहीर करण्यास सांगितलं. अर्शदीप सिंगने भारतातील टॉप 5 गोलंदाजांची नावं सांगितली आणि आर अश्विनची माफी मागितली. यात त्याने भुवनेश्वर कुमारला सर्वात वरचं स्थान दिलं, तर दिग्गज फिरकीपटू आर अश्विनला शेवटच्या स्थानावर ठेवलं. अर्शदीप सिंगच्या यादीत मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांची नावंही आहे. अर्शदीप सिंग म्हणाला की, ‘मला एश भाईला शेवटच्या स्थानी ठेवायचे नाही, पण जागा रिकामी नसल्यामुळे तो पाचव्या क्रमांकावर असेल. तो एक महान क्रिकेटपटू आहे आणि आयपीएलमध्ये पंजाब किंग्सचा माझा पहिला कर्णधार होता. माफ करा एश भाई, मी तुम्हाला एक वैयक्तिक संदेश पाठवीन.’

अर्शदीप सिंग पुढे म्हणाला की, ‘मी भुवनेश्वर कुमारला अव्वल स्थानी ठेवीन कारण तो माझा वैयक्तिक आवडता आहे. तो मला खूप आवडतो, त्यामुळे त्याला पाठिंबा देणे हेच योग्य आहे. मी शमी भाईला दुसऱ्या क्रमांकावर ठेवीन कारण तो कोणत्याही खेळपट्टीवर सीम गोलंदाजी करू शकतो.’ अर्शदीप सिंगने चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवच्या कौशल्याची आणि बळी घेण्याच्या क्षमतेची प्रशंसा करत त्याला तिसऱ्या स्थानावर ठेवले आहे. तर पंजाब किंग्समधील सहकारी युझवेंद्र चहलच्या प्रभावी कामगिरीमुळे त्याला चौथे स्थान दिले आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी