Bachchu Kadu : अकोल्यात पालकमंत्री बच्चू कडू यांनी केले आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलीचे कन्यादान

| Updated on: Jun 14, 2022 | 12:01 AM

पालकमंत्री बच्चू कडू यांनी कन्यादानाची जबाबदारी घेतली. त्यानुसार पालकमंत्री आले. वधुपित्याच्या आत्मियतेने सहभागी झाले. पुरोहितांनी सांगितले; त्याप्रमाणे विधीवत पूजा करुन जावई प्रविण आणि कन्या दुर्गा यांचे पूजन करुन दुर्गा ही कन्या जावई प्रविण ह्यांच्याकडे सुपूर्द केली. व्याही विलासराव यांच्याकडून दुर्गाला नीट सांभाळण्याचे अभिवचन घेतले.

Bachchu Kadu : अकोल्यात पालकमंत्री बच्चू कडू यांनी केले आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलीचे कन्यादान
अकोल्यात पालकमंत्री बच्चू कडू यांनी केले आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलीचे कन्यादान
Image Credit source: TV9
Follow us on

अकोला : मुलीचे लग्न आणि तिचे कन्यादान (Kanyadan) हा बापाच्या आयुष्यातील कसोटीचा प्रसंग म्हणून नेहमीच वर्णिला जातो. नियतीने ज्या मुलींचे पितृछत्र हिरावून घेतले, त्या मुली ही वेदना अधिक जाणू शकतात. आज अशाच एका हळव्या प्रसंगात पालकमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) पहावयास मिळाले. एरवी आक्रमक, आंदोलक, निडर भासणारे पालकमंत्री (Guardian Minister) याठिकाणी खूपच हळवे आणि भावूक भासत होते. मुलीचे लग्न आणि तिचे कन्यादान हे प्रसंग मुलीच्या बापाच्या जीवनात कसोटीचे असतात ते यासाठीच. चि.सौ.कां. दुर्गा ही अशीच एक मुलगी. तिचे वडील बाळापूर तालुक्यातील व्याळा येथील भास्करराव तराळे आणि आई प्रमिला ह्या दोघांचे छत्र हिरावले गेलेले. काळ कधीच कुणासाठी थांबत नसतो. मातापित्याचे छत्र असलेच म्हणजे मुलं मोठी होतात असे नव्हे, ती मोठी होतातच. अशीच दुर्गाही मोठी झाली. तिच्या दोन मोठ्या बहिणींचे लग्न यापूर्वीच झाले होते.

मुरलीधर राऊत दरवर्षी अनाथ मुलींचं लग्न करतात

दुर्गाचे मेव्हणे व मामा ह्यांनी मिळून तिच्या लग्नासाठी वरसंशोधन सुरु केले. बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्यातील कंचनपूर येथील विलासराव बहुरुपी यांचे चिरंजीव प्रविण ह्यांच्या स्थळाचा होकार आला. आता लग्नसमारंभ करुन देण्याचा प्रश्न आला. व्याळ्या जवळच हॉटेल मराठाचे संचालक मुरलीधर राऊत हे दरवर्षी अनाथ मुलींचे लग्न समारंभ त्यांच्या वतीने करुन देतात. तेथेच हा विवाह सोहळा करण्याचे ठरले आणि आज हा लग्न समारंभ पार पडला.

बच्चू कडू यांनी कन्यादानाची जबाबदारी घेतली

पालकमंत्री बच्चू कडू यांनी कन्यादानाची जबाबदारी घेतली. त्यानुसार पालकमंत्री आले. वधुपित्याच्या आत्मियतेने सहभागी झाले. पुरोहितांनी सांगितले; त्याप्रमाणे विधीवत पूजा करुन जावई प्रविण आणि कन्या दुर्गा यांचे पूजन करुन दुर्गा ही कन्या जावई प्रविण ह्यांच्याकडे सुपूर्द केली. व्याही विलासराव यांच्याकडून दुर्गाला नीट सांभाळण्याचे अभिवचन घेतले. पित्याच्या मायेने जावई आणि लेक यांना आहेर केला आणि शुभाशिर्वाद दिला. या विवाह सोहळ्यासाठी हॉटेल मराठाचे संचालक मुरलीधर राऊत, अमोल जमोदे, महेश आंबेकर, श्रीकांत धनोकार, अनिल गवई, पद्मजा मानकर, रमेश ठाकरे ही सेवाभावी मंडळी घरचं कार्य असल्याप्रमाणे सगळं हवं ते पहात होते. (In Akola Guardian Minister Bachchu Kadu did kanyadan of a girl who committed suicide)

हे सुद्धा वाचा