धडगाव ठरला राज्यातील पहिला कोरोनामुक्त तालुका, रुग्णसंख्या शून्यावर, धडगाव पॅटर्नचा स्पेशल रिपोर्ट

| Updated on: Jun 20, 2021 | 12:36 PM

नंदुरबार शहराप्रमाणे दुर्गम ग्रामीण भागातही कोरोना विळखा पाहायला मिळत होता. मात्र नंदुरबारमधील धडगाव हा राज्यातील पहिला कोरोनामुक्त तालुका ठरला आहे. (Nandurbar Dhadgaon becomes first corona free taluka)

धडगाव ठरला राज्यातील पहिला कोरोनामुक्त तालुका, रुग्णसंख्या शून्यावर, धडगाव पॅटर्नचा स्पेशल रिपोर्ट
DHADGAON TALUKA
Follow us on

नंदूरबार : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव पाहायला मिळत होता. नंदुरबार शहराप्रमाणे दुर्गम ग्रामीण भागातही कोरोना विळखा पाहायला मिळत आहे. मात्र नंदुरबारमधील धडगाव हा राज्यातील पहिला कोरोनामुक्त तालुका ठरला आहे. गेल्या आठवड्याभरात धडगाव तालुक्यात एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे या भागात कोरोनावर कशी मात करण्यात आली, या धडगाव पॅटर्नवरचा खास रिपोर्ट. (Nandurbar Dhadgaon becomes first corona free taluka in the state Special Pattern Dhadgaon pattern)

सातपुड्याचा डोंगर रांगांमध्ये वसलेला हा दुर्गम तालुका धडगाव…. धडगाव तालुक्यात दुसऱ्याला लाटेत कोरोना रुग्णाची संख्या वाढली. यानंतर नागरिकांनी शासनाने घातलेल्या निर्बंधांचे पालन करत अंमलबजावणी केली. दुर्गम भागातील गावागावात जाऊन स्वॅब कलेक्शन करण्यासाठी 15 पथके तयार करण्यात आली. त्यामुळे कोरोळा साखळी ब्रेक करण्यास मदत झाली. तसेच बाजारपेठांच्या गावांमध्ये बाजारपेठ सुरू होण्यापूर्वी सर्व दुकानदारांची कोरोना चाचणी करण्यात आली.

?धडगाव तालुक्यात कोरोनामुक्तीसाठी केलेल्या उपाययोजना

? कोरोनाच्या पहिल्या लाटेत धडगाव तालुक्यात 100 पेक्षा कमी रुग्णसंख्या

? दुसऱ्या लाटेत धडगाव तालुक्यातील ग्रामीण भागातही कोरोनाची झळ.

? उपाययोजनांसाठी तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे, आरोग्य अधिकारी डॉक्टर दिनेश वळवी यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील जनता कर्फ्यू लावणारा पहिला तालुका

? जनता कर्फ्यूचे कडक निर्बंधानंतर प्रथम व्यापाऱ्यांचे कोरोना चाचणी

? त्यानंतरच बाजारपेठा सुरू करण्यास परवानगी

? धडगाव बाजारपेठेत वेळोवेळी सॅनिटायझरची फवारणी

?  तालुक्यातील तेरा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांद्वारे एकूण 15 टीम तयार करण्यात आल्या

? दोन मोबाईल व्हॅनचादेखील समावेश आहे. मोबाइल व्हॅनद्वारे खेड्यापाड्यात जाऊन कोरोना चाचणी आणि रॅपिड अँटीजन चाचणीवर भर दिला.

? धडगाव येथे 45 खाटांचे आणि मांडवी येथे 100 खाटांचे कोविड केअर सेंटरची निर्मिती करून रुग्णांवर उपचार.

?  ग्रामपंचायत स्तरावर दहा अलगीकरण कक्ष आणि वसतिगृहात अलगीकरण कक्षाची निर्मिती

? प्राथमिक उपचारानंतर रुग्णांना घरी न पाठवता अलगीकरण लक्षात ठेवण्याची सोय.

?धडगावात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या शून्य

दरम्यान धडगाव तालुक्यात आतापर्यंत 862 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी 22 जणांचा मृत्यू झाला तर 840 जण बरे झाले आहे. धडगाव तालुक्यात सद्यस्थितीत एकही रुग्ण नाही. त्यामुळे ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या शून्य झाली आहे. दुर्गम भागातील नागरिकांनी प्रशासनाला साथ देत दाखवलेला संयम आणि शिस्त यामुळे जे या आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांना जमले, ते इतरांना जमेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.  (Nandurbar Dhadgaon becomes first corona free taluka in the state Special Pattern Dhadgaon pattern)

संबंधित बातम्या : 

नाशिकमध्येही शनिवार-रविवारी पर्यटनस्थळं बंद, सोमवारपासून मॉल सुरू होणार; छगन भुजबळ यांची घोषणा

2024मध्ये मुख्यमंत्री कुणाचा होणार?, प्रफुल्ल पटेलांनी सांगितला फॉर्म्युला; पटोले, राऊतांना शिकवला शहाणपणा!