नाशिकमध्येही शनिवार-रविवारी पर्यटनस्थळं बंद, सोमवारपासून मॉल सुरू होणार; छगन भुजबळ यांची घोषणा

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भिती आणि पर्यटनस्थळावर होणारी पर्यटकांची गर्दी या पार्श्वभूमीवर पुण्यापाठोपाठ नाशिकमध्येही शनिवार-रविवारी पर्यटन स्थळं बंद ठेवण्यात येणार आहेत. (Tourist Sites)

नाशिकमध्येही शनिवार-रविवारी पर्यटनस्थळं बंद, सोमवारपासून मॉल सुरू होणार; छगन भुजबळ यांची घोषणा
छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठामंत्री

नाशिक: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भिती आणि पर्यटनस्थळावर होणारी पर्यटकांची गर्दी या पार्श्वभूमीवर पुण्यापाठोपाठ नाशिकमध्येही शनिवार-रविवारी पर्यटन स्थळं बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच सोमवारपासून जिल्ह्यातील मॉलही सुरू करण्यात येणार आहेत. नाशिकचे पालक मंत्री छगन भुजबळ यांनी तशी घोषणा केली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांची चांगलीच कोंडी झाली आहे. (Tourist Sites will Close weekend Due to Overcrowding in nashik)

छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. पाऊस सुरू झाल्याने नाशिकमध्ये पर्यटनस्थळावर गर्दी वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. परिणामी शनिवार आणि रविवारी जिल्ह्यातील पर्यटन स्थळ बंद ठेवण्यात येणार आहे. पर्यटनस्थळांवरील गर्दी टाळण्यासाठी या ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली. तसेच कालसर्प आणि नारायण नागबळीबाबत शासन स्तरावर निर्णय घेतला जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. भुजबळ यांनी यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या तर शिवसेनेला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

नाशिकमध्ये ऑक्सिजनची कमतरता

नाशिकचा मृत्यूदर 1.74 टक्के आहे. मृत्यू संख्या लपवणे हा उद्देश नाही. खासगी रुग्णालयातील माहिती अपूर्ण आहे. ही टेक्निकल चूक असून दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे. तर जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 4.74 टक्के आहे. जिल्ह्यात 9 टक्के बेड फुल आहेत. जिल्ह्याला 400 मॅट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. आपल्याकडे सध्या 155 मॅट्रिक टन ऑक्सिजन आहे, असं त्यांनी सांगितलं. नाशिकमध्ये अभ्यासिका सुरू करण्याचा निर्णय पुढील आठवड्यात घेतला जाणार आहे. तसेच त्र्यंबकेश्वर धार्मिक विधी सुरू करण्याचा निर्णय राज्यस्तरावर होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

मॉलच्या कर्मचाऱ्यांच लसीकरण करा

शहरात येत्या सोमवारपासून मॉल सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. दुपारी 4 वाजेपर्यंतच मॉल सुरू ठेवता येणार आहे, असं सांगतानाच मॉलच्या कर्मचाऱ्यांचं तातडीने लसीकरण करा, असे आदेशही त्यांनी दिले.

केंद्र सरकार टोलवाटोलवी करतंय

ओबीसी आरक्षणावर भाजने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ओबीसींसाठी भाजप आंदोलन करत आहे ही चांगली गोष्ट आहे. आम्ही त्याचं स्वागत करतो. ओबीसींच्या आरक्षणासाठी त्यांनी केंद्र स्तरावरही पाठपुरावा करावा. जनगणना आणि डेटा हा विषय केंद्राकडे आहे. अनेकवेळा पत्रव्यवहार केला. त्याला अद्याप उत्तर आलं नाही. केंद्र सरकार टोलवाटोलवी करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

तर भाजपचीही मदत घेऊ

कोरोना काळात डेटा गोळा करण्याचं काम कोण करणार? आहे तो डेटा केंद्राने दिला पाहिजे, या मागणीसाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. ओबीसी संघटनाही कोर्टात दावा करणार आहे, असं सांगतानाच वेळप्रसंगी आम्ही भाजपची मदतही घेऊ, असा चिमटाही त्यांनी काढला. (Tourist Sites will Close weekend Due to Overcrowding in nashik)

 

संबंधित बातम्या:

Pune Weekend Lockdown : फिरायला जाणाऱ्यांना 15 दिवस क्वारंटाईन करणार, अजित पवारांचा पुणेकरांना इशारा

आषाढी एकादशीला 10 मानाच्या पालख्यांचा होणार ‘लाल परी’तून प्रवास; अनिल परब यांची माहिती

Maharashtra Coronavirus LIVE Update : पुण्यात विकेंड लॉकडाऊन लागू, अजित पवारांच्या बैठकीत एकमताने निर्णय

(Tourist Sites will Close weekend Due to Overcrowding in nashik)