दुर्दैवानं महाराष्ट्र कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेंच्या उंबरठ्यावर, प्रविण दरेकरांचं वक्तव्य

| Updated on: Sep 08, 2021 | 7:11 PM

विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते रत्नागिरीत कोरोना हॉस्पिटलचं लोकार्पण करण्यात आलं.जिल्ह्यातील चार कोरोना सेंटर्सचे लोकार्पण करण्यात आले. दरेकर यांनी यावेळी महाराष्ट्र दुर्दैवानं तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असल्याचं म्हटलं आहे.

दुर्दैवानं महाराष्ट्र कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेंच्या उंबरठ्यावर, प्रविण दरेकरांचं वक्तव्य
प्रविण दरेकर
Follow us on

रत्नागिरी: विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते रत्नागिरीत कोरोना हॉस्पिटलचं लोकार्पण करण्यात आलं.जिल्ह्यातील चार कोरोना सेंटर्सचे लोकार्पण करण्यात आले. दरेकर यांनी यावेळी महाराष्ट्र दुर्दैवानं तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असल्याचं म्हटलं आहे. कोरोना संकटात भाजपने नेहमी मदत केली आहे. कोरोना काळात महाराष्ट्रात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. कोविड संकट हे शाप की वरदान हा संशोधनाचा विषय असल्याचं ते म्हणाले आहेत.

विकासासाठी स्पर्धा करा

चिपी विमानतळावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात कलगीतूरा सुरु आहे. असं असताना मुख्यमंत्री चिपी विमानतळाच्या उदघाटनासाठी आले तर आनंद आहे. या विमानतळाच्या उदघाटनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच व्यासपीठावर येवून कोकणचा विकास होणार असेल तर त्याचे स्वागत आहे, अशी भूमिका विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी मांडलीय. विकासासाठी स्पर्धा करा सिंधुदुर्गप्रमाणे कोकणात नवीन विमानतळ उभारण्यासाठी स्पर्धा करा असा सल्ला देखिल दरेकर यांनी शिवसेनेला दिलाय.

शिवसेना आमदार निधी मिळत नसल्यानं व्यथित

महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना आमदार निधी मिळत नसल्याने व्यथिक आहेत. शिवसेना राष्ट्रवादीच्या जाळ्यात अडकलीय. राष्ट्रवादीकडे अर्थमंत्री पद आहे शिवसेना आमदारांना त्यांच्या हक्काचा निधी देखिल मिळत नाहीय असा आरोप देखिल विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केलाय.

नारायण राणेंची अटक बेकायदेशीर

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झालेली अटक पूर्णपणे बेकायदेशीर होती. अधिकाऱ्यांनी कुणाच्या दबावाखाली अटक केली हे तपासात नक्की पुढे येईल असं मत विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केलंय.

नारायण राणेंनी ठरवलेली तारीख अधिकृत

चिपी विमानतळावरून सेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगलाय. या मुद्यावरून विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकरांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय. एखाद्या प्रकल्पाच्या उदघाटनाचा अधिकार केंद्र सरकारचा आहे असं सष्ट मत प्रविण दरेकर यांनी सष्ट केलंय. चिपी विमाानतळाच्या उदघाटनावरून विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकरांचा शिवसेनेला टोला लगावलाय. कुठलाही पक्ष सरकारी प्रकल्पाची तारिख ठरवत नसतो कारण तो कार्यक्रम खासगी होतो नाराय़ण राणें केंद्र सरकारचा एक भाग आहेत, नाराय़ण राणेंनी केंद्रीय उड्डाण मंत्र्यांशी बोलून उदघाटनाची तारीख ठरवली आहे त्यामुळे तीच अधिकृत आहे, असं प्रविण दरेकर म्हणाले.

हवाई उड्डाण खातं राज्याच्या मुख्यमंत्र्याना बोलणावर असेल तर एकत्रित कार्यक्रम झाला तर आमच्या पोटात दुखायचं कारण नाही असंही मत प्रविण दरेकरांनी व्यक्त केलंय. ईडीचा वापर केंद्र सरकार करत या विधानावरून प्रविण दरेकरांचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना उत्तर दिलंय.कुठलिही यंत्रणा असो चुकिच्या पद्धतीने वापर करता येत नाही, कुणाला झटका आला म्हणुन ईडीच्या चौकशीला बोलावलं जात नाही असं रोख ठोक मत प्रविण दरेकर यांनी सष्ट केलंय.

इतर बातम्या:

राजीव गांधी मोठे नेते, नेहरु गांधींचं नाव बदलण्याचं या सरकारचं धोरण, राऊतांचा हल्लाबोल

स्वत:ला गाव राखता आलं नाही अन् राऊतांना कसलं आव्हान देताय; मुश्रीफांचा चंद्रकांतदादांना खोचक टोला

Pravin Darekar said Corona third wave at doors of Maharashtra