Nanded | पावसाळ्याच्या तोंडावर रस्ता आणि ड्रेनेजची कामं संथगतीनं, सत्ताधारी नगसेवकानेच टीका करत दिला घरचा आहेर

| Updated on: Jul 03, 2022 | 9:34 AM

नांदेड शहरात ऐन पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्यासह विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. मात्र या कामांना अजिबातच गती मिळताना दिसत नाहीये. यावर आता चक्क सत्ताधारी नगसेवक बापूराव गजभारे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून टिका केल्याने आर्श्चय व्यक्त केले जात आहे. गजभारे यांनी ही टिका करून घरचा आहेर दिलाय.

Nanded | पावसाळ्याच्या तोंडावर रस्ता आणि ड्रेनेजची कामं संथगतीनं, सत्ताधारी नगसेवकानेच टीका करत दिला घरचा आहेर
Image Credit source: tv9
Follow us on

नांदेड : पावसाळ्याच्या अगोदरच रस्त्यांची आणि ड्रेनेजची (Drainage) कामे पूर्ण होणे महत्वाचे असते. जर ड्रेनेज खराब असेल तर पावसाळ्यामध्ये अनेक समस्या निर्माण होतात. तसेच रस्त्यावरील खड्डे देखील पावसाळ्याच्या अगोदर बुजवणे आवश्यक आहे. मात्र, नांदेडच्या (Nanded) महापालिका प्रशासनाला उशीरा जाग आल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्यासह विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. पावसाळ्यामध्येच शहरातील अनेक ठिकाणची रस्ते खोदून ठेवण्यात आल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे. मात्र, या गलथान कारभाराविरोधात चक्क सत्ताधारी नगरसेवकानेच (Corporator) टिका केलीयं.

सोशल मीडियाच्या माध्यमातून केली सत्ताधारी नगरसेवकाने टिका

नांदेड शहरात ऐन पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्यासह विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. मात्र या कामांना अजिबातच गती मिळताना दिसत नाहीये. यावर आता चक्क सत्ताधारी नगसेवक बापूराव गजभारे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून टिका केल्याने आर्श्चय व्यक्त केले जाते. गजभारे यांनी ही टिका करून घरचा आहेर दिलाय. रस्ते आणि ड्रेनेजच्या कामासाठी रस्ते खोदून ठेवत काम रखडल्याने नगरसेवक गजभारे यांनी जोरदार टीका केली. गजभारे यांच्या या टीकेमुळे नांदेडकरांच्या समस्येची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होतेय.

हे सुद्धा वाचा

पावसाळ्याच्या तोंडावर संथगतीने सुरू विकासकामे

नगरसेवक गजभारे यांनी सोशल मीडियावर विकास कामे संथगतीने सुरू असल्याने नागरिकांना मोठा त्रास होत असल्याची पोस्ट टाकल्यानंतर एकच चर्चा सुरू झाली. यावेळी tv9 च्या प्रतिनिधींनी नगरसेवक गजभारे यांना बोलण्याचा प्रयत्न केला असता, गजभारे म्हणाले की, एक तर आता पावसाला सुरूवात झालायं आणि रस्त्यांची कामे देखील सुरू आहेत. रस्त्यांची कामे अतिशय संथगतीने सुरू आहेत. गेल्या एक महिन्यापासून शहरातील विविध भागांमध्ये कामे सुरू आहेत. मात्र, फक्त मोठ्या मोठ्या मशनरी रस्त्यावर उभा करून ठेवण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षात काम सुरू नाहीये. रस्ता बंद असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.