AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut: 2019 मध्ये भाजपने शिवसेनेचे 30 उमेदवार पाडले, संजय राऊतांचं दीपक केसरकरांवर पलटवार

2019 ला केसरकारांविरोधात भाजपने राजन तेली नावाचा बंडखोर उभा केला होता. भाजपने बंडखोरांना बळ दिलं आणि याच कारणामुळे शिवसेनेचे तब्बल 30 उमेदवार पडले

Sanjay Raut: 2019 मध्ये भाजपने शिवसेनेचे 30 उमेदवार पाडले, संजय राऊतांचं दीपक केसरकरांवर पलटवार
संजय राऊतांचं दीपक केसरकरांवर पलटवारImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jul 03, 2022 | 8:31 AM
Share

मुंबई: सामनाच्या रोखठोक मधून शिवसेना नेते संजय राऊतांनी (Shivsena Sanjay Raut) शिंदे गटाचे  प्रवक्ते दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांच्यावर चांगलाच पलटवार केलाय.2019मध्ये भाजपने शिवसेनेचे 30 उमेदवार पडले असं सामनाच्या रोखठोक मध्ये संजय राऊत म्हणालेत. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांना अचानक हिंदुत्वाचा आणि भाजपचा पुळका कसा आला हे समजण्यासारखं आहे असंही ते म्हणालेत. 2019 ला केसरकारांविरोधात भाजपने (BJP) राजन तेली नावाचा बंडखोर उभा केला होता. भाजपने बंडखोरांना बळ दिलं आणि याच कारणामुळे शिवसेनेचे तब्बल 30 उमेदवार पडले, शिवसेनेच्या आमदारांची संख्या कमी व्हावी व मुख्यमंत्रीपदावरील शिवसेनेचा दावा कमजोर व्हावा यासाठीच ही खेळी होती असं संजय राऊत रोखठोकमध्ये म्हटलेत. शिवाय शिंदे गटात सामील झालेल्यांपैकी असे किमान 17 आमदार असतील ज्यांना भाजपने पडण्याचा प्रयत्न केलाय हेही त्यांनी आवर्जून सांगितलंय.

सामनाच्या रोखठोक मधून संजय राऊतांचा पलटवार!

  • श्री. दीपक केसरकर हे शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत. त्यांना अचानक हिंदुत्वाचा आणि भाजपचा पुळका आला हे समजण्यासारखे आहे, पण केसरकर ज्या सावंतवाडी मतदारसंघातून 2019 ला निवडून आले तेथे भाजपबरोबर युती असतानाही केसरकरांविरोधात राजन तेली हा बंडखोर भाजपने उभा केला होता व त्यांच्या प्रचारासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत स्वतः आले.
  • 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेचे 30 उमेदवार भाजपने बळ दिलेल्या बंडखोरांमुळे पडले. शिवसेनेच्या आमदारांची संख्या कमी व्हावी व मुख्यमंत्रीपदावरील शिवसेनेचा दावा कमजोर व्हावा यासाठीच ही खेळी होती. शिंदे गटात आज सामील असलेल्या किमान 17 आमदारांना भाजपने सरळ पाडण्याचे प्रयत्न केले हे सत्य आहे.

मलाही गुवाहाटीवरून ऑफर होती – संजय राऊत

ईडी चौकशी नंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मलाही गुवाहाटीला येण्याची ऑफर होती. पण मी गेलो नाही. कारण मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, असं संजय राऊत म्हणाले. जेव्हा कारण नसताना चौकश्या होतात. तेव्हा आपण या चौकशांना सामोरे गेलं पाहिजे. अशावेळी तू काही केलं नाही, असं आपला अंतरात्मा सांगत असतो. निर्भिडपणे चौकशीला सामोरे जा, असंही अंतरात्मा सांगत असतो. त्याच आत्मविश्वासाने चौकशीला सामोरे गेलो. दहा तासाने बाहेर आलो. मलाही मार्ग होता गुवाहाटीला जाण्याचा. ऑफरही होते. मलाही बोलावण्याचे प्रयत्न झाले ना. पण आम्ही नाही गेलो. आम्ही ठाकरे शिवसेना यांच्यासोबत राहिलो, असं संजय राऊत म्हणाले.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?