सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजचे स्वप्न सत्यात उतरणार, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची मंजुरी, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

| Updated on: Feb 12, 2022 | 11:59 AM

सिंधुदुर्गच्या (Sindhudurg) जनतेचं स्वप्न असणारं वैद्यकीय महाविद्यालय सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोकणातील पहिल्या सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजचे (Government Medical College) स्वप्न आता सत्यात उतरणार आहे.

सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजचे स्वप्न सत्यात उतरणार, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची मंजुरी, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
Sindhudurg Medical College
Follow us on

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गच्या जनतेची गेल्या 30 वर्षांची प्रतीक्षा संपणार आहे. सिंधुदुर्गच्या (Sindhudurg) जनतेचं स्वप्न असणारं वैद्यकीय महाविद्यालय सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोकणातील पहिल्या सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजचे (Government Medical College) स्वप्न आता सत्यात उतरणार आहे.या शासकीय मेडिकल कॉलेजला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (National Medical Council) मंजुरी दिली आहे.यावर्षी 100 सीट एमबीबीएस अभ्यासक्रमात प्रवेश देण्यास मान्यता मिळाल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आणि मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. एस. एस. मोरे यांनी दिली.अनेक अडथळे पार करत आणि अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सिंधुदुर्गवासीयांचे मेडिकल कॉलेजचे स्वप्न सत्यात उतरले आहे.त्यामुळे जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयासाठी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी लोकसभेत मुद्दा मांडला होता. या महाविद्यालयाला परवानगी मिळावी म्हणून उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी देखील प्रयत्न केले होते.

100 विद्यार्थ्यांना प्रवेश, एमबीबीएस अभ्यासक्रम सुरु

सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आणि मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. एस. एस. मोरे यांनी यासंदर्भात माहिती दिली. शासकीय मेडिकल कॉलेजला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने मंजुरी दिल्याची माहिती त्यांनी दिली. यावर्षी 100 जागांवर एमबीबीएस अभ्यासक्रमास प्रवेश देण्यास मान्यता मिळाल्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली.

वैद्यकीय महाविद्यालयासाठी 30 वर्षांची प्रतीक्षा

गेली पंचवीस-तीस वर्षे सिंधुदुर्ग जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रतीक्षेत होता. सप्टेंबरमध्ये एनएमसीकडून देण्यात आलेली मान्यता रद्द करण्यात आल्यानं सिंधुदुर्गवासियांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची प्रतीक्षा वाढली होती. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी त्यावेळी केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती.

सप्टेंबरमध्ये मान्यता मिलाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हावासीयांसाठी ही आनंदाची बाब असून त्यामुळे जिल्हा वैद्यकीय क्षेत्रात स्वावलंबी बनणार आहे.अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली होती.”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला आहे मात्र जे मंत्री, मुख्यमंत्री झाले त्यांनी स्वतःची खासगी मेडिकल कॉलेज काढली”, असा टोला त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लगावला होता.

इतर बातम्या:

 

PHOTO: अख्खा गाव रात्री हलगीवर थिरकला, काय झालं काय विचारता? अहो मुलगी झाली, सव्वा क्विंटल जिलेबी वाटली…

Drone farming technology : आधुनिक शेती करायचीय? मग मनसुख मांडवीय यांनी Share केलेला ‘हा’ Video पाहाच