तालिबान-अफगाणिस्तान संघर्षाचा जळगावातील केळी उत्पादकांना फटका, निर्यात ठप्प, शेतकरी हवालदिल

| Updated on: Aug 20, 2021 | 6:10 PM

जिल्ह्यातील शेकडो क्विंटल केळी अरब राष्ट्रांमध्ये निर्यात होतात. अफगाणिस्तानात देखील मोठ्या प्रमाणावर केळीची निर्यात पूर्वापार होत आहे. मात्र, सध्याच्या काळात अफगाणिस्तानमध्ये उद्भवलेल्या संकटामुळे केळीची निर्यात ठप्प झाली आहे.

तालिबान-अफगाणिस्तान संघर्षाचा जळगावातील केळी उत्पादकांना फटका, निर्यात ठप्प, शेतकरी हवालदिल
तालिबान-अफगाणिस्तान संघर्षाचा जळगावातील केळी उत्पादकांना फटका, निर्यात ठप्प, शेतकरी हवालदिल
Follow us on

जळगाव : जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना तालिबान-अफगाणिस्तान संघर्षाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. अफगाणिस्तानात सध्या गंभीर परिस्थिती असल्याने भारतातून होणाऱ्या व्यापारावर परिणाम झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील शेकडो क्विंटल केळी अफगाणिस्तानमध्ये निर्यात केली जात होती. परंतु, अलीकडे ही निर्यातही थांबल्याने जळगाव जिल्ह्यात तसेच काश्मीर सीमेवर केळीचे कंटेनर उभे आहेत. काही व्यापाऱ्यांनी सौदे रद्द केल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. (Taliban-Afghanistan conflict hits banana growers in Jalgaon, Export halted)

अफगाणिस्तानातील संकटामुळे केळीची निर्यात ठप्प

जिल्ह्यातील शेकडो क्विंटल केळी अरब राष्ट्रांमध्ये निर्यात होतात. अफगाणिस्तानात देखील मोठ्या प्रमाणावर केळीची निर्यात पूर्वापार होत आहे. मात्र, सध्याच्या काळात अफगाणिस्तानमध्ये उद्भवलेल्या संकटामुळे केळीची निर्यात ठप्प झाली आहे. त्यामुळे जळगावातील केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यातून दररोज किमान 10 ते 15 कंटेनर केळी (कंटेनर क्षमता 20 टन) परदेशात निर्यात होते. अफगाणिस्तानमध्येही शेकडो क्विंटल केळी इराणमार्गे निर्यात केली जाते. सध्या ही निर्यात बंद आहे. अफगाणिस्तानमध्ये निर्यात होणाऱ्या केळीला सध्या प्रतिक्विंटल 1400 ते 1450 रुपयांचा दर शेतकऱ्यांना मिळत होता. पण निर्यातच ठप्प असल्याने शेतकऱ्यांची केळी वाया जाण्याची भीती वाटत आहे.

आवक वाढल्याने केळीचे दर कोसळले

अफगाणिस्तानमध्ये जाणारी केळी स्थानिक बाजारात विक्रीसाठी नेण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर दुसरा पर्याय नाही. अशा परिस्थितीत स्थानिक बाजारात केळीची आवक वाढल्याने केळीचे दर कोसळले आहेत. केळीला 1200 ते 1250 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. स्थानिक बाजारात हीच परिस्थिती अजून काही दिवस कायम राहिली तर केळीचे दर अजून घसरतील. अनेक शेतकऱ्यांनी केळीची कापणी थांबवली आहे. (Taliban-Afghanistan conflict hits banana growers in Jalgaon, Export halted)

इतर बातम्या

रावसाहेब दानवेंकडून राहुल गांधींवर विखारी टीका, आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर

झेंडा बदलला तर भूमिकाही बदलली का? राज ठाकरे म्हणतात, एका कडवट..