झेंडा बदलला तर भूमिकाही बदलली का? राज ठाकरे म्हणतात, एका कडवट..

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या सर्व चर्चांवर खास ठाकरी शैलीत उत्तर दिलंय. त्यांनी तो झेंडा मला पक्षस्थापनेपासून आणायचा होता. एका कडवट मराठी आणि अत्यंत कडवट हिंदुत्ववादी अशा घरात माझा जन्म झालाय, त्यामुळे माझ्यावर झालेले संस्कार तेच आहेत," असं ठाकरे यांनी म्हटंलय.

झेंडा बदलला तर भूमिकाही बदलली का? राज ठाकरे म्हणतात, एका कडवट..
raj thackeray

मुंबई : मनसेचा झेंडा बदलल्यानंतर राज ठाकरे यांची भूमिका बदलली का ? मनसेची भूमिका नेमकी कोणती आहे ? असे अनेक प्रश्न विचारले जातात. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी या सर्व चर्चांवर खास ठाकरी शैलीत उत्तर दिलंय. त्यांनी तो झेंडा मला पक्षस्थापनेपासून आणायचा होता. एका कडवट मराठी आणि अत्यंत कडवट हिंदुत्ववादी अशा घरात माझा जन्म झालाय, त्यामुळे माझ्यावर झालेले संस्कार तेच आहेत,” असं ठाकरे यांनी म्हटंलय. (Raj Thackeray talked about MNS flag colour said I am born in Marathi and Hindu family)

राज ठाकरे यांना मनसेच्या झेंड्याबद्दल विचारण्यात आलं

राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. तसेच शाखाध्यक्षांच्या निवडीची घोषणा केली. यानंतर राज यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मनसेच्या झेंड्याबद्दल विचारण्यात आलं. मनसेची स्थापना झाली तेव्हा पक्षाचा झेंडा हा बहुरंगी आणि सर्वसमावेशक होता. आता मात्र पक्षाचा झेंडा बदलण्यात आलाय. हा बदल तुमच्या भूमिकेमधीलही आहे का ? असं ठाकरे यांना विचारण्यात आलं. यावर राज यांनी उत्तर दिलं.

माझा जन्म कडवट मराठी, अत्यंत कडवट हिंदुत्वावादी घरात झाला

“मनसेचा सध्याचा झेंडा पक्षस्थापनेपासूनच माझ्या डोक्यात होता. तो मला सतत आणायचा होता. तो कधी आणायचा हे सगळं सुरु होतं. त्यानंतर एके दिवशी तो झेंडा आणायचा हे ठरवलं. ही गोष्ट पहिल्यापासून माझ्या डोक्यात होती. माझा जन्म हा कडवट मराठी आणि अत्यंत कडवट हिंदुत्वावादी घरात झाला आहे. त्यामुळे माझ्यावर झालेले संस्कार तेच आहेत. हे लक्षात ठेवावे,” असं ठाकरे यांनी म्हटलंय.

बाबासाहेब पुरंदरेंना  शिवशाहीर म्हणून भेटतो, ब्राह्मण म्हणून नाही

राज ठाकरे यांनी बाबसाहेब पुरंदरे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांच्यावर अनेकांनी टीका केली. या टीकेवर बोलताना राज यांनी पुरंदरे यांच्याकडे मी इतिहास संशोधक म्हणून जातो, असं म्हटलंय . ” मी बाबासाहेब पुरंदरेंना भेटतो. ते शिवशाहीर म्हणून भेटतो. ब्राह्मण म्हणून भेटत नाही. शरद पवारांना भेटतो तेव्हा मराठा म्हणून भेटत नाही. तुम्हाला भेटतो तेव्हा तुमची जात पाहून भेटत नाही. आपण यातून बाहेर पडलं पाहिजे,” अशा शब्दांत राज ठाकरे यांनी टीकाकारांना उत्तर दिलं.

इतर बातम्या :

पुरंदरे ते प्रबोधनकार, शरद पवार ते संभाजी ब्रिगेड, राज ठाकरेंचे 10 मोठे मुद्दे

शरद पवार भाषणाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या नावानं का करत नाहीत? राज ठाकरेंचा सवाल

Video | टोल वसुलीवरुन मनसे पुन्हा आक्रमक, भिवंडीमध्ये लाठ्या-काठ्यांसह टोलनाक्याची तोडफोड

(raj thackeray talked about mns flag colour said i am born in marathi and hindu family)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI