Fireflies : भंडारदरा परिसरात अवतरली काजव्यांची लखलखती दुनिया, अद्भुत दृष्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

| Updated on: Jun 13, 2022 | 11:34 PM

लक्ष लक्ष काजव्यांची ही चमचमती दुनिया बघितली तर आकाशातील तारे जणू धरणीवर आल्याचा भास होतो. काजव्यांचा लयबद्ध चमचमाट सध्या भंडारदरा धरण परिसरात सुरु आहे. ही सर्व अद्भुत दृष्य डोळ्यांची पारणे फेडणारी आहेत. गेल्या दोन वर्षांपासून भंडारदरा धरण परिसरात काजवा महोत्सव सुरू करण्यात आला आहे. मात्र काजवा महोत्सवाचा आनंद लुटताना पर्यटकांनी निसर्गाची हानी होईल असे कृत्य करू नये असं आवाहन स्थानिकांसह पोलीस प्रशासनाने केले आहे.

Fireflies : भंडारदरा परिसरात अवतरली काजव्यांची लखलखती दुनिया, अद्भुत दृष्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
भंडारदरा परिसरात अवतरली काजव्यांची लखलखती दुनिया
Image Credit source: TV9
Follow us on

भंडारदरा / अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असणाऱ्या भंडारदरा-घाटघर परिसरातील वृक्षांवर काजव्यांची मायावी दुनिया अवतरली आहे. दरवर्षी मे महिन्याचा शेवटचा आठवडा आणि जून महिन्याचा पहिला पंधरवडा या दरम्यानच्या काळात हे काजवे (Fireflies) येथे अवतरतात. हे नयनरम्य दृष्य बघण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक (Tourist) भंडारदरा परिसरात गर्दी (Crowd) करतात. जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाचे आगमन झाले आणि पुन्हा एकदा काजव्यांची ही अद्भुत दुनिया बघण्यासाठी पर्यटकांची पाऊले भंडारदरा परिसराकडे वळू लागली आहेत. राजूर येथील प्रसिद्ध फोटोग्राफर विलास तुपे यांनी ही दृश्ये कैद केली आहेत.

जूनच्या पहिल्या आठवड्यात काजव्यांचा प्रजनन काळ असल्याने एकत्र येतात

राज्यातील सर्वात उंच असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी वसलेल्या उडदावणे, पांजरे, मुरशेत, भंडारदरा, चिचोंडी, बारी, मुतखेल, कोलटेंभे या आदिवासी खेड्यांच्या शिवारात तसेच रंधा धबधब्याजवळ हजारो झाडे लक्षावधी काजव्यांनी लगडली आहेत. हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर अशा निवडक झाडांवरच काजव्यांचा हा काही दिवसांचा ‘बसेरा’ असतो. जूनच्या पहिल्या आठवड्यात काजव्यांचा प्रजनन काळ असल्याने पुढील पंधरा दिवस रात्रीच्या सुमारास लाखो काजवे झाडावर एकत्र जमतात. कोरोना संकटामुळे गेली दोन वर्षे पर्यटनस्थळे बंद असल्याने काजव्यांची ही अनोखी दुनिया बघता न आल्याने निसर्गप्रेमींचा हिरमोड झाला होता.

डोळ्यांची पारणे फेडणारी अद्भुत दृष्य

लक्ष लक्ष काजव्यांची ही चमचमती दुनिया बघितली तर आकाशातील तारे जणू धरणीवर आल्याचा भास होतो. काजव्यांचा लयबद्ध चमचमाट सध्या भंडारदरा धरण परिसरात सुरु आहे. ही सर्व अद्भुत दृष्य डोळ्यांची पारणे फेडणारी आहेत. गेल्या दोन वर्षांपासून भंडारदरा धरण परिसरात काजवा महोत्सव सुरू करण्यात आला आहे. मात्र काजवा महोत्सवाचा आनंद लुटताना पर्यटकांनी निसर्गाची हानी होईल असे कृत्य करू नये असं आवाहन स्थानिकांसह पोलीस प्रशासनाने केले आहे. आता तुम्हालाही ही काजव्यांची चमचमती दुनिया बघायची असेल तर लवकरच अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाचा परिसर गाठावा लागेल. (The world of fireflies sparkled in the reservoir, the crowd of tourists to see the wonderful view)

हे सुद्धा वाचा