निवडणूक तिकडे, जुंपली इकडे, हिंगोली विजयी जल्लोषात घुगे-वडकुतेंमधील वाद चव्हाट्यावर

हिंगोलीतील गजानन घुगे आणि रामराव वडकुते हे दोघेही तगडे नेते आहेत. मात्र आपापसातील मतभेदावरून हिंगोली भाजपामध्ये दोन गट असल्याचं स्पष्ट दिसून येतं.

निवडणूक तिकडे, जुंपली इकडे, हिंगोली विजयी जल्लोषात घुगे-वडकुतेंमधील वाद चव्हाट्यावर
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 10:58 AM

हिंगोलीः राज्यसभा निवडणुकीत (Rajyasabha Election) सहाव्या जागेवर भाजपचे धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) निवडून आल्यानंतर राज्यभरातील भाजपाच्या शाखांमध्ये जल्लोष करण्यात आला. हिंगोलीतदेखील (Hingoli BJP) भाजपा नेत्यांनी शनिवारी सकाळी विजयाचा जल्लोष साजरा केला. या  यावेळी स्थानिक चॅनलला प्रतिक्रिया देण्यावरून दोन आमदारांमध्ये चांगलीच जुंपली. आधी शिवसेनेत आणि आता भाजपात असलेले माजी आमदार गजानन घुगे यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून भाजपाच्या जिल्हाध्यक्ष चांगलेच चिडले. गेल्या काही दिवसांपासून हा टोमणेबाजीचा प्रकार सुरु असल्याचं जिल्हाध्यक्ष बोलले आणि मिरवणुकीतलं वातावरण काही काळ तणावपूर्ण झालं. यानंतर इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्षांना शांत केलं. मात्र या विजयी मिरवणुकीच्या निमित्ताने हिंगोली भाजपातील मतभेत चव्हाट्यावर आलेले दिसून आले.

काय घडलं नेमकं?

शनिवारी सकाळी हिंगोली भाजपतर्फे महात्मा गांधी चौकात विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आमदार तानाजी मुटकुळे, जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार रामराव वडकुते, माजी खासदार शिवाजी माने, माजी आमदार गजानन घुगे, मिलिंद यंबल, प्रकाश थोरात, फुलाजी षिंदे, संतोष टेकाळे आदी उपस्थित होते. या मिरवणुकीत एका चॅनलला प्रतिक्रिया देताना माजी आमदार गजानन घुगे म्हणाले, आधी ज्यांनी राज्यसभेसाठी मतदान केले आहे, त्यांनाच बोलू द्या… मात्र भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामराव वडकूते यावरून चांगलेच भडकले. गजानन घुगे आणि वडकुते यांच्याती शाब्दिक चकमक झाल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

हे सुद्धा वाचा

नेत्यांमध्ये वादाचं मुख्य कारण काय?

हिंगोलीतील गजानन घुगे आणि रामराव वडकुते हे दोघेही तगडे नेते आहेत. मात्र आपापसातील मतभेदावरून हिंगोली भाजपामध्ये दोन गट असल्याचं स्पष्ट दिसून येतं. त्यातच आता विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. कळमनुरी विधानसभा मतदार संघावर दोघांचाही डोळा असल्याचं सांगितलं जातं. यावरूनच आरोप प्रत्यारोप, टोमणेबाजीही मोठ्या प्रमाणावर सुरु असते. शनिवारच्या मिरवणुकीत हा प्रकार सहन न झाल्यानं दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. यात माजी खासदार शिवाजी माने यांना मध्यस्थी करावी लागली.

Non Stop LIVE Update
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले...
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले....
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर.
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या.
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.