AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar: रोहित पवारांचाही VSR व्हेंचर्सच्या विमानातून प्रवास, हा दिग्गज क्रिकेटपटूही सोबत, कंपनीविरोधात शंकेचे काहूर उठवताना मोठी अपडेट समोर

Rohit Pawar -Ajit Pawar- VSR Company: अजितदादांचे विमान अपघातात अकाली निधन झाल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी या कंपनीविरोधात काहूर उठवले आहे. या कंपनीच्या कारभाराविरोधात आणि वैमानिकावर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. तर रोहित पवार यांनी सुद्धा या कंपनीच्या विमानातून प्रवास केल्याची माहिती समोर येत आहे.

Rohit Pawar: रोहित पवारांचाही VSR व्हेंचर्सच्या विमानातून प्रवास, हा दिग्गज क्रिकेटपटूही सोबत, कंपनीविरोधात शंकेचे काहूर उठवताना मोठी अपडेट समोर
रोहित पवार, अजित पवार, व्हीएसआर व्हेंचर्सImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Feb 14, 2026 | 8:37 AM
Share

Rohit Pawar -Ajit Pawar- VSR Company: अजितदादांची अकाली एक्झिट सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली. पण हा विमान अपघात होता की घातपात यावरून सध्या काहूर उठले आहे. शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी तर VSR या विमान कंपनीविरोधात मोठा मोर्चा उघडला आहे. त्यांनी दोन पत्रकार परिषद घेत या कंपनीच्या कारभाराची पोलखोल केली. तसेच 27 जानेवारी 2026 रोजीच्या घटनाक्रमावरून त्यांनी दादांच्या पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांवर हल्ला चढवला आहे. दादांना त्या दिवशी उशीर झाल्यानेच त्यांनी दुसर्‍या दिवशी विमानाने जाण्याचा निर्णय घेतला आणि हाच निर्णय घातक ठरल्याचे त्यांनी इंगित केले. तर ऐनवेळी वैमानिक आणि विमान बदलल्याच्या चर्चाही मोठ्या प्रमाणात होत आहे. रोहित पवार या विमान कंपनीविरोधात आक्रमक झाले असले तरी त्यांनी सु्द्धा एका दिग्गज क्रिकेटपटूसोबत VSR कंपनीच्या विमानातून प्रवास केल्याचे आता समोर येत आहे.

व्हीएसआर कंपनीच्या विमानाने बारामती प्रवास

शरद पवार एनसीपी आमदार रोहित पवार यांनी ३ ऑक्टोबर २०२४ रोजी व्हीएसआर कंपनीच्या विमानाने मुंबई ते बारामती असा प्रवास केला होता. व्हीएसआर कंपनी कारभार विषयी रोहित पवारांनी अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणानंतर घातपात आणि विमान कंपनीबाबीत प्रश्न उपस्थित केल्यानंतर आत्ता नवी माहिती समोर आली आहे.

रोहित पवार याच्यासह गाठली बारामती

प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मासह आमदार रोहित पवार यांनी चार्टर विमानाने प्रवास केला. मुंबई ते बारामती दरम्यान व्हीएसआर कंपनीच्या चार्टर विमानातून हा प्रवास झाल्याचे नवे पुरावे समोर आले आहे. बारामतीला जाण्यासाठी याच कंपनीचं विमान रोहित पवार यांनी वापरले होते. कंपनीच्या कारभाराविषयी रोहित पवार आता नवनवीन शंका उपस्थित करत असताना नवी माहिती उघड झाली आहे.

व्हीएसआर व्हेंचर्सच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत प्रेझेंटन्शन दिले. त्यात त्यांनी व्हीएसआर व्हेंचर्स या कंपनीच्या कारभारावर असंख्य प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी काही चॅटिंग समोर आणली. त्यात कंपनीचे मालक आणि पायलट यांच्यातील संवाद समोर आणला. त्यात काही पायलट हे अट्टल मद्यपी असल्याचे समोर आले. तर कंपनी वैमानिकांना आराम करू देत नसल्याकडे ही त्यांनी लक्ष वेधले. विमान हे गुजरातमधून आले होते. वेळेवर पायलट बदलला असे अनेक संशयाचे काहूर सध्या उठलेले आहे. तर या कंपनीवर अद्याप बंदी का घातली जात नाही असा सवालही रोहित पवार यांनी विचारला होता. दरम्यान त्यांनी सु्द्धा याच कंपनीच्या विमानातून प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे.

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ