AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छट पूजेच्या वादात आदित्य ठाकरेंची उडी; म्हणाले, महाराष्ट्र अन् मुंबईत…

छट पूजेच्या वादात आदित्य ठाकरेंची उडी घेतली आहे. छट पूजेचा वाद हा भाजप पुरस्कृत आहे, अशी टीका आमदार आदित्य ठाकरे यांनी केली.

छट पूजेच्या वादात आदित्य ठाकरेंची उडी; म्हणाले, महाराष्ट्र अन् मुंबईत...
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 15, 2026 | 8:26 AM
Share

मुंबईत छट पूजेवरून राजकारण तापलं आहे. छट पूजेनिमित्त रेल्वे स्टेशनवरही गाणे वाजवण्यात आले. रेल्वेच्या निर्णयाचा मनसेने जोरदार विरोध केला. राज ठाकरे यांनी छट पूजेच्या वादावरून भाजपवर जोरदार टीका केली. मनसेनंतर आता ठाकरे गटानेही या वादात उडी घेतली आहे. आदित्य ठाकरे यांनी छट पूजेच्या वादावरून सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली आहे. छट पूजेचा वाद हा भाजप पुरस्कृत असल्याची टीका केली.

छट पूजेवरून आदित्य ठाकरे म्हणाले,’छट पूजेचा वाद कुठेही नाहीत, त्यांना फक्त वाद वाढवायचे आहेत. तेच फक्त या गोष्टी करत आहेत. त्याला मुंबईत अस्थिरता हवी आहे. संजय राऊत यांनी सुद्धा यावर भाष्य केलंय. राज ठाकरे सुद्धा यावर बोलले आहेत. महाराष्ट्रात आणि मुंबई एक समाज आणि दुसरा समाज असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय.  छट पूजेचा वाद हा भाजप स्पॉन्सर्ड आहे. आपल्याला उकसवून आपल्याला राग आणून खरे विषय महागाई असेल, हे सगळे विषय भ्रष्टाचाराचा विषय असेल, या सगळ्या विषयांवरून लक्ष विचलित करायचं, भाजपचा प्रयत्न आहे’.  राहुल गांधींच्या फोन टॅपिंगच्या आरोपावरही आदित्य ठाकरेंनी भाष्य केलं. गांधींनी म्हटलं की, ‘तुमचाही फोन टॅपिंग होत असेल, हे 100 टक्के लिहून घ्या.  एका बाजूला राजकीय फोर्सचा वापर विरोधकांवर केला जातोय. ही जी यंत्रणा आहे, ती देशविरोधी कारवाई करणाऱ्या वर वापरली तर देशाचे भलं होईल’.

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणवर आदित्य ठाकरे म्हणाले, ‘आम्ही सुद्धा या बातम्या ऐकल्या आहेत. याबाबत आम्हालाही माहीत नाही, आम्हाला शरद पवार साहेबांकडून कोणतीही अधिकृत सूचना आलेली नाही’.  शिंदे गटावर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, ‘जे तिकडे गेले, तिथे महाराष्ट्राची ज्यांनी गद्दारी केली, त्याचं एकच कारण होतं, ते म्हणजे पैसा आणि सत्ता. भाजपने गळचेपी केल्यानंतर त्यांना कुठेतरी वाटतंय की आपण नाव गमवतोय. आता ते मार्ग शोधायचा प्रयत्न करतायेत. उद्धव साहेबांपर्यंत येण्याचा प्रयत्न करतायेत. मला राजकारणात जायचं नाही, पण या लोकांनी एका घाणेरड्या स्तरापर्यंत राजकारण नेऊन ठेवले, यावरून वाटतं.. महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय.पालकमंत्र्यांच्या घरावर दगडफेक होते, विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत. दुष्काळामुळे शेतकरी त्रस्त आहेत. सध्या महाराष्ट्रात मोठा प्रश्न आहे, तो म्हणजे पाण्याचा,  मराठवाड्यात पंधरा दिवसांनी एकदा पाणी येत आहे. ती परिस्थिती मुंबई सुद्धा होणार आहे. प्रदूषण वाढते आहे, केंद्रीय पर्यावरण मंत्री कुठे आहेत, असा सवाल यावेळी त्यांनी केला.

Follow Us
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका; सीएनजीच्या दरात एवढ्या रुपयांची वाढ
CNG Price Hike Mumbai : मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका; सीएनजीच्या दरात एवढ्या रुपयांची वाढ, पहा नवीन दर
गिरगाव चौपाटीवर यंदा छठपूजा करता येणार नाही; उच्च न्यायालयाच्या...
Mumbai : गिरगाव चौपाटीवर यंदा छठपूजा करता येणार नाही; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाचे सूचना फलक
ऑपरेशन टायगर निश्चित, पण तारीख गुलदस्त्यात; उदय सामंतांच्या विधानाने..
Shivsena : ऑपरेशन टायगर निश्चित, पण तारीख गुलदस्त्यात; उदय सामंतांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत..
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं!
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ...
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ, मध्यरात्रीपासून नवे दर लागू
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत सस्पेन्स कायम
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले, लहान मतदारसंघांसाठी...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले, मला मार्गदर्शनाची...
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण..
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण समोर