AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NCP विलिनीकरणाच्या चर्चांदरम्यान अमित शाह पुण्यात, भाजप एकत्रि‍करणासाठी का इतकी आग्रही?

NCP Merger Amit Shah: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची खलबतं, वावड्या, वांझोट्या चर्चा असं सर्व काही सुरू आहे. त्यातच केंद्रीय मंत्री अमित शाह हे पुणे दौऱ्यावर आले आहेत. ते दोन दिवस पुण्यात तळ ठोकून असतील. या दौऱ्या दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्याशी त्यांची चर्चा होण्याची शक्यता आहे.

NCP विलिनीकरणाच्या चर्चांदरम्यान अमित शाह पुण्यात, भाजप एकत्रि‍करणासाठी का इतकी आग्रही?
NCP विलिनीकरणाच्या चर्चादरम्यान अमित शाह पुण्यात, भाजप एकत्रि‍करणासाठी का इतकी आग्रही?
| Updated on: Nov 15, 2026 | 8:20 AM
Share

NCP Merger Amit Shah: राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात दिलजमाई होणार की नाही हा राजकारणातील सध्याचा हॉट विषय आहे. एनसीपीच्या विलिनीकरणाची खलबतं, वावड्या, वांझोट्या चर्चा असं सर्व काही सुरू असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यात तळ ठोकला आहे. ते दोन दिवस पुण्यात असतील. विविध कार्यक्रमात ते सहभागी होतील. पुणे जिल्हा परिषदेचा कार्यक्रम पण यादीत आहे. त्यात दिवंगत अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरणही होणार आहे. या कार्यक्रमासाठी अमित शाह हे 20 मिनिटांसाठी येणार होते. आता त्यांचा वेळ वाढून 40 मिनिटं करण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या दौऱ्यात ते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

दादा गेला, विलिनीकरणारला फुलस्टॉप

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या खासदार आणि कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण अथवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत NDA मध्ये सहभागी होण्याची शक्यता फेटाळून लावली. शनिवारी माध्यमांशी बोलताना दादा गेला, विलिनीकरणाला पूर्णविराम मिळाला असे त्यांनी सांगितले. अजितदादा होते, तेव्हाच दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चर्चा होती, पण आता दादा नाही, त्यामुळे या चर्चाही संपल्या आहेत.

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी भाजप का आग्रही?

आगामी राजकीय गणित पाहता भाजप दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी आग्रही आहे. मतदारसंघ पुनर्निर्माण विधेयक आणि महिला आरक्षण बिल हिवाळी अधिवेशनात सादर होण्याची शक्यता आहे. भाजप हे बिल पुन्हा आणण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर येत आहेत. त्यासाठी हिवाळी अधिवेशन अथवा त्यापूर्वी विशेष अधिवेशन बोलवण्याची शक्यता आहे. हे विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपला अजून 44 खासदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. शरद पवार राष्ट्रवादीचे लोकसभेत 8 आणि राज्यसभेत एक खासदार आहे. एनडीएला हे बिल मंजूर करण्यासाठी एक एक खासदार महत्त्वाचा आहे. यामुळे अमित शाह यांचा पुणे दौराही चर्चेत आला आहे. आता विलिनीकरणाबाबत काय निर्णय होतो आणि पुढील रणनीती काय ठरते हे लवकरच समोर येईल.

Follow Us
गिरगाव चौपाटीवर यंदा छठपूजा करता येणार नाही; उच्च न्यायालयाच्या...
Mumbai : गिरगाव चौपाटीवर यंदा छठपूजा करता येणार नाही; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाचे सूचना फलक
ऑपरेशन टायगर निश्चित, पण तारीख गुलदस्त्यात; उदय सामंतांच्या विधानाने..
Shivsena : ऑपरेशन टायगर निश्चित, पण तारीख गुलदस्त्यात; उदय सामंतांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत..
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं!
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ...
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ, मध्यरात्रीपासून नवे दर लागू
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत सस्पेन्स कायम
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले, लहान मतदारसंघांसाठी...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले, मला मार्गदर्शनाची...
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण..
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण समोर
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावले...
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावलेल्या मुलाची विचारपूस