AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NCP Merger: राष्ट्रवादी विलिनीकरणात मोठा ट्विस्ट, एकत्रि‍करणाच्या चर्चांना ब्रेक, मग शरद पवार NDA मध्ये सहभागी होणार?

NCP Merger: या दिवाळीत राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या फराळावर सर्वच राजकीय पक्षांनी ताव मारला. तृप्तीचा ढेकर दिला. पण हे एकत्रि‍करणाचं गाडं काही केल्या पुढे सरकलं नाही. दिल्ली, पुणे आणि मुंबईत चर्चेची गुऱ्हाळं रंगली. पण चर्चा वांझोट्या ठरल्या. आता एक नवीन ट्विस्ट आला आहे.

NCP Merger: राष्ट्रवादी विलिनीकरणात मोठा ट्विस्ट, एकत्रि‍करणाच्या चर्चांना ब्रेक, मग शरद पवार NDA मध्ये सहभागी होणार?
राष्ट्रवादी विलिनीकरणाला ब्रेक, मग शरद पवार NDA मध्ये सहभागी होणार?
| Updated on: Nov 14, 2026 | 10:39 AM
Share

NCP Merger Sharad Pawar BJP: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना दोन आठवड्यात मोठी हवा मिळाली. मुंबई, पुणे, बारामती आणि दिल्लीत चर्चेची गुऱ्हाळं रंगली. पण एकत्रि‍करणाचं गाडं कोणीच पुढं हाकलं नाही. पण चर्चा वांझोट्या ठरल्या. त्यातच आता एक नवीन ट्विस्ट आला आहे. विलिनीकरण जरी होणार नसले तरी शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) सहभागी होण्याचा पर्याय शोधत असल्याचा सूर उमटत आहेत. विना विलिनीकरण NDA मध्ये राष्ट्रवादी सहभागी होऊ शकते असा दावा करण्यात येत आहे. अर्थात या सुद्धा चर्चाच आहे. हिवाळी अधिवेशानापूर्वी विशेष अधिवेशन बोलवून त्यात महिला विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूरीसाठी भाजपला बहुमताची गरज आहे. त्यातून या चर्चा समोर आल्या आहेत.

विलिनीकरणाची चाचपणी?

सत्तेतील राष्ट्रवादीने विलिनीकरणाची चाचपणी केली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयाने काही आमदारांशी संपर्क साधला. त्यातून आमदारांचे विलिनीकरणाविषयी काय मत आहे ते जाणून घेतल्याची माहिती समोर येत आहे. विलिनीकरण झाल्यावर पक्षाची स्थिती, बड्या नेत्यांचे राजकीय अस्तित्व, पक्षीय बांधणी, पक्षीय जबाबदारी, पक्षीय नेतृत्व या सर्व अंगाने विचार विनिमय झाला. दोन्ही पक्षाकडून विलिनीकरणाची चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

राष्ट्रवादीचा तिसरा गट?

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत ज्येष्ठ नेते नाराज असल्याचे अनेकदा समोर आले आहे. अजितदादांच्या विमान अपघातानंतर राष्ट्रवादीतील भांडणं चव्हाट्यावर आली होती. त्यातून वरिष्ठ नेते शरद पवारांच्या भेटीलाही गेले. या सर्व घडामोडीत सत्ताधारी राष्ट्रवादीतही शक्कलं होण्याची भीती व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीतील हा गट शरद पवार यांच्या पक्षासोबत जाऊन सत्तेत जुळवून घेण्याची कसरत करत असल्याचा दावा राजकीय विश्लेषक करत आहेत. पडद्याआड काय घडामोडी घडत आहेत, हे काही दिवसात समोर येईल.

शरद पवार NDA जवळ करणार?

सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार यांचा पक्ष हा स्वतंत्र पक्ष म्हणून सत्ताधारी NDA मध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी दिल्लीत स्पष्ट सांगितले की, अजितदादा गेल्यानंतर विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे. पण काल सुळे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांच्यात एक बैठक झाल्याची माहितीही समोर येत आहे. विलिनीकरण झाल्यास केंद्रातही एकत्रित पक्षाला चांगली पदं मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्थात या सर्व जरतरच्या गोष्टी आहेत. याविषयीची अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Follow Us
जळगाव भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला, मुक्ताईनगर-रावेरमध्ये सकाळी 9.16..
Jalgaon : जळगाव जिल्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला, मुक्ताईनगर-रावेरमध्ये सकाळी 9.16 वाजता जमीन थरथरली; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
पुण्यातील ऐतिहासिक नूमवी प्रशालेत पाकिस्तानचे झेंडे; जय श्री राम....
Pune : पुण्यातील ऐतिहासिक नूमवी प्रशालेत पाकिस्तानचे झेंडे; जय श्री राम चित्रपटाच्या शूटिंगवरून नवा वाद
करुणा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? हर्षवर्धन सपकाळांची भेट घेतली
Karuna Munde : करुणा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? हर्षवर्धन सपकाळ यांची घेतली भेट; चर्चांना उधाण
बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या बैठकीत ठाकरे गटाला डावललं?
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या बैठकीत ठाकरे गटाला डावललं? मुंबई महापालिकेतील बैठकीवरून नवा राजकीय वाद
राज ठाकरे काहीही करा, छठपूजा थांबणार नाही; सदावर्तेंचं थेट आव्हान...
Gunaratna Sadavarte On Raj Thackeray : राज ठाकरे काहीही करा, छठपूजा थांबणार नाही; सदावर्तेंचं थेट आव्हान
दिल्लीत पटेल-सुप्रिया सुळेंची भेट, सुनेत्रा पवारांची आमदारांशी चर्चा..
NCP : दिल्लीत पटेल-सुप्रिया सुळेंची भेट, मुंबईत सुनेत्रा पवारांची आमदारांशी चर्चा; राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय?
पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रॅव्हल बसचा गंभीर अपघात, बस चालक आणि....
Pune-Solapur Highway : पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रॅव्हल बसचा गंभीर अपघात, बस चालक आणि प्रवासी जखमी; वाहतुकीचा खोळंबा
मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्स...
Microsoft Services Down : मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्सना फटका; ई-मेल पाठवणं आणि उघडणं कठीण
गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
Ram Kadam On Thackeray Brothers : गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचा फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता
Price Rate Hike : भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचाही फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं