AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळेंची दिल्लीत गुप्त बैठक? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा मोठा दावा काय?

प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्या दिल्लीतील कथित गुप्त भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये विलिनीकरणाची चर्चा सुरू असतानाच, शरद पवार गटाने या वृत्ताचे खंडन केले. सुप्रिया सुळे यांची भेट संसदीय समितीसाठी होती, असे स्पष्टीकरण दिले.

प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळेंची दिल्लीत गुप्त बैठक? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा मोठा दावा काय?
sharad pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 14, 2026 | 10:35 AM
Share

अजितदादा गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांची काल दिल्लीत 35 मिनिटे गुप्त मिटिंग झाल्याची चर्चा आहे. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. ही माहिती आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दोन्ही पक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसापर्यंत एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. ही चर्चा सुरू असतानाच शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या बैठकीबाबत अंकुश काकडे यांना विचारलं असता काकडे मीडियावरच भडकले. त्या बैठकीच्या ठिकाणी मीडियावाले होते का? तुम्ही सूत्रांच्या हवाल्याने काही सांगू नका. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची कोणतीही बैठक झाली नाही. सुप्रिया सुळे दोन दिवसांपासून दिल्लीत आहेत. त्यांची संसदेच्या एका समितीची बैठक होती. तसं त्यांनी स्पष्टही केलं होतं. तर सुनील तटकरे हे स्टँडिंग कमिटीच्या मिटिंग निमित्ताने दिल्लीत होते. त्यांनीही त्याची माहिती दिली होती. प्रफुल्ल पटेल त्यांच्या काही कामानिमित्ताने दिल्लीत गेले असतील. संसदेत भेट झाल्यावर हाय हॅलो होतं. याचा अर्थ असा नाही की चर्चा झाली, असं अंकुश काकडे म्हणाले.

भुजबळांनी दुजोरा दिला

आमच्याकडे विलिनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. आमच्या पक्षातही वरिष्ठ पातळीवर कोणतीही चर्चा झालेली नाही. जे काही चालू आहे ते अजितदादांच्या पक्षात सुरू आहे. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी तो विषय काढला. त्याला भुजबळांनी दुजोरा दिला. त्यांच्या पक्षात ही चर्चा सुरू आहे. आमच्या पक्षात कोणतीही चर्चा नाही. एकत्रिकरण आणि विलिनीकरणावर काहीच सुरू नाही. सुप्रिया सुळे यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे, असं काकडे यांनी स्पष्ट केलं.

आमच्या पक्षाकडून चर्चा नाही

आमच्या पक्षाकडून कोणीच चर्चा करत नाही. आमचे निर्णय शरद पवार आणि सुप्रिया सुळे घेत असतात. दोघे निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल. सुप्रिया सुळेंनी आधीच चर्चा झाली नसल्याचं सांगितलं आहे, असंही ते म्हणाले.

त्यावर शशिकांत शिंदे बोलतील

अजितदादा गटाचे आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जातं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. आमदार संपर्कात असल्याची कल्पना नाही. या बाबतची माहिती तुम्हाला वरिष्ठ पातळीवरच मिळेल. शशिकांत शिंदे, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड त्यावर बोलतील. मी शहरातील नेता आहे. पक्षाच्या कोअर कमिटीत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. दुसऱ्या पक्षाच्या खासदाराने काही सांगितलं असेल तर तुम्ही त्यांचाच विचारलं पाहिजे. आमच्या नेत्यांनी सांगितलं का? जर तरच्या गोष्टीवर प्रतिक्रिया देणं योग्य नाही, असं त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटलंय.

Follow Us
जळगाव भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला, मुक्ताईनगर-रावेरमध्ये सकाळी 9.16..
Jalgaon : जळगाव जिल्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला, मुक्ताईनगर-रावेरमध्ये सकाळी 9.16 वाजता जमीन थरथरली; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
पुण्यातील ऐतिहासिक नूमवी प्रशालेत पाकिस्तानचे झेंडे; जय श्री राम....
Pune : पुण्यातील ऐतिहासिक नूमवी प्रशालेत पाकिस्तानचे झेंडे; जय श्री राम चित्रपटाच्या शूटिंगवरून नवा वाद
करुणा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? हर्षवर्धन सपकाळांची भेट घेतली
Karuna Munde : करुणा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? हर्षवर्धन सपकाळ यांची घेतली भेट; चर्चांना उधाण
बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या बैठकीत ठाकरे गटाला डावललं?
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या बैठकीत ठाकरे गटाला डावललं? मुंबई महापालिकेतील बैठकीवरून नवा राजकीय वाद
राज ठाकरे काहीही करा, छठपूजा थांबणार नाही; सदावर्तेंचं थेट आव्हान...
Gunaratna Sadavarte On Raj Thackeray : राज ठाकरे काहीही करा, छठपूजा थांबणार नाही; सदावर्तेंचं थेट आव्हान
दिल्लीत पटेल-सुप्रिया सुळेंची भेट, सुनेत्रा पवारांची आमदारांशी चर्चा..
NCP : दिल्लीत पटेल-सुप्रिया सुळेंची भेट, मुंबईत सुनेत्रा पवारांची आमदारांशी चर्चा; राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय?
पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रॅव्हल बसचा गंभीर अपघात, बस चालक आणि....
Pune-Solapur Highway : पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रॅव्हल बसचा गंभीर अपघात, बस चालक आणि प्रवासी जखमी; वाहतुकीचा खोळंबा
मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्स...
Microsoft Services Down : मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्सना फटका; ई-मेल पाठवणं आणि उघडणं कठीण
गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
Ram Kadam On Thackeray Brothers : गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचा फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता
Price Rate Hike : भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचाही फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं