Bachchan Family : बच्चन कुटुंबियांचे प्रॉपर्टीचे वाद चव्हाट्यावर, कोण आहे रमोला बच्चन? जिने केलाय धक्कादायक दावा
Bachchan Family : बच्चन कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. पण आता बच्चन कुटुंबियांचे प्रॉपर्टीचे वाद चव्हाट्यावर आले आहेत. ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. रमोला बच्चन यांनी केलेल्या धक्कादायक दाव्यानंतर प्रकरण कोर्टात पोहोचलं आहे. तर जाणून घ्या कोण आहेत रमोला बच्चन?

Bachchan Family : बॉलिवूडच्या प्रतिष्ठित बच्चन कुटुंबियांची चर्चा रंगल्यानंतर सर्वांच्या समोर फक्त दोन चेहरे समोर येतात आणि ते म्हणजे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन यांचा… पण आता चर्चेत बच्चन कुटुंबातील तिसरीच व्यक्ती आहे, ती म्हणजे रमोला बच्चन… रमोला बच्चन यांनी धक्कादायक दावा केल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. रमोला बच्चन यांनी ‘जलसा’ बंगल्यावर स्वतःचा मालकी हक्क सांगितला आहे. सांगायचं झालं तर, सध्या ज्या ‘जलसा’ बंगल्यावरून वाद सुरु आहे, त्या बंगल्यात बिग बी आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब राहतं. रिपोर्टनुसार, रमोला यांचा असा दावा आहे की, प्रॉपर्टीच्या कागदपत्रांवर त्यांचं नाव आहे… तर जाणून घ्या, ज्यांच्यामुळे बच्चन कुटुंबियांचे प्रॉपर्टीचे वाद चव्हाट्यावर पोहोचले आहेत, त्या रमोल बच्चन कोण आहेत आणि काय करतात?
कोण आहेत रमोल बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत काय आहे त्यांचं नातं?
रमोला बच्चन एक फॅशन डिझायनर आणि बिजनेसवुमन आहे. त्या अमिताभ बच्चन यांचे लहान भाऊ अजिताभ बच्चन यांच्या पूर्व पत्नी आहे. असं देखील सांगितलं जातं की, अजिताभ बच्चन आणि रमोला यांची भेट बिग बी यांनीच घडवून आणली.. त्यानंतर 1973 मध्ये अजिताभ आणि रमोला यांचं लग्न पार पडलं. त्याचं वर्षी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचं देखील लग्न झालं होतं. रमोला आणि अजिताभ यांना चार मुलं आहेत – भीम, नम्रता, नैना आणि नीलिमा… त्यांची लेक निलिमा यांचे लग्न अभिनेता कुणाल कपूर यांच्यासोबत झालं आहे.
रमोला बच्चन यांचं शिक्षण किती?
रमोल बच्चन यांचा जन्म 1947 मध्ये कोलकाता मध्ये झालं होतं. त्यांनी इंग्रजी साहित्य आणि राज्यशास्त्राचा अभ्यास केला. त्यानंतर, रमोला बिझनेस मॅनेजमेंटच्या शिक्षणासाठी अमेरिकेला गेल्या. त्यांनी लंडनमध्ये सॉलिसिटर म्हणूनही प्रशिक्षण घेतलं. त्यांची पहिली नोकरी एअर होस्टेसची होती. मात्र, पुढे त्यांनी इतर अनेक क्षेत्रांत स्वतःची ओळख निर्माण केली.
फॅशनपासून टेलिव्हिजन आणि इव्हेंट व्यवसायापर्यंतचा रामोला यांचा प्रवास
रामोला यांची कारकीर्द केवळ फॅशन डिझाइनपुरती मर्यादित नव्हती. लंडनमध्ये त्यांनी ‘टीव्ही आशिया’साठी निवेदक म्हणून काम केलं; या काळात त्यांनी टोनी ब्लेअर, इम्रान खान आणि रवी शंकर यांसारख्या दिग्गज व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या. भारतात परतल्यावर त्यांनी ‘फर्स्ट रिसॉर्ट’ नावाचा, सुट्ट्यांच्या काळातील कपड्यांचा ब्रँड सुरू केला. त्यानंतर, त्यांनी ‘आरबीसी इव्हेंट्स’ (RBC Events) नावाची कंपनी चालवत इव्हेंट व्यवस्थापनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं. याव्यतिरिक्त, दिल्लीमध्ये त्या खाद्यपदार्थ व्यवसायाशीही संबंधित होत्या.
जलसा बंगल्यासंबंधी पूर्ण विवाद?
रमोला बच्चन यांनी अमिताभ बच्चन यांच्या जुहू स्थित ‘जलसा’ बंगल्यावर त्यांचा मालकी हक्क आहे असं सांगितलं आहे. रिपोर्टनुसार, रमोला यांचा दावा आहे की, 1993 मध्ये एक गिफ्ट डीड तयार करण्यात आली आणि त्यावर सर्व मालकी हक्क जया बच्चन यांच्या नावावर करण्यात आले. रमोला यांचा असा आरोप आहे की, त्यांनी कोणतीही माहिती न देता अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबियांनी कागदपत्र तयार केले.
सरकारी कागदपत्रांमध्ये ‘जलसा’ कोणाच्या नावावर
या वादात समोर आलेल्या कागदपत्रांबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कपोले हाऊसिंग सोसायटीच्या नोंदींमध्ये ‘जलसा’च्या मालक म्हणून जया बच्चन यांचं नाव आहे. दुसरीकडे, महाराष्ट्र सरकारच्या प्रॉपर्टी कार्डमध्ये अद्यापही रमोला बच्चन यांचं नाव नोंदवलेलं असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या हे प्रकरण सुनावणीच्या टप्प्यावर आहे. यावर बच्चन कुटुंबियांनी कोणतीच अधिकृत घोषणा केलेली नाही.
